अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात शेतीविषयक अटी टाळा,

US India Trade: अमेरिकेसोबतचा व्यापार करार शेतकऱ्यांच्या पोटावर पाय?

US India trade: भारत आणि अमेरिकेमध्ये प्रस्तावित व्यापार करारावरून देशातील शेतकरी संघटनांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. विशेषतः या करारात शेतीशी संबंधित अटी व शर्ती समाविष्ट झाल्यास त्याचा फटका थेट भारतीय शेतकऱ्यांना बसणार असल्याचा इशारा इंडियन को-ऑर्डिनेशन कमिटी ऑफ फार्मर्स मूव्हमेंट्स (ICCFM) या प्रमुख शेतकरी संघटनेने दिला आहे.

ICCFM ही संघटना देशभरातील विविध राज्यांमधील शेतकरी संघटनांचे प्रतिनिधित्व करते. पंजाब, हरियाणा, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूतील शेतकरी संघटनांचा समन्वय साधत ही संघटना शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करत आहे. त्यांनी केंद्र सरकारकडे ठणकावून सांगितले आहे की, अमेरिकेसोबतच्या व्यापार करारात जर कृषी क्षेत्राशी संबंधित मुद्दे सामावले, तर भारतीय शेती आणि शेतकऱ्यांच्या स्वावलंबनाला गंभीर धक्का बसेल. हेही वाचा: मीरा रोडमधील सभेतील भाषणामुळे राज ठाकरे गोत्यात? अमेरिकन शेती उत्पादनांवर करमुक्तीचा धोका

ICCFM ने केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांना पत्राद्वारे मागणी केली आहे की, अमेरिकन कृषी उत्पादनांना भारतात करमुक्त प्रवेश दिल्यास भारतीय बाजारपेठेवर त्याचा गंभीर परिणाम होईल. स्वस्त दरात अमेरिकन माल बाजारात आल्यास भारतीय शेतकऱ्यांचे उत्पन्न घटण्याचा धोका निर्माण होईल.अमेरिकेच्या कृषी निर्यातीवर अलीकडच्या काळात परिणाम झाल्याने ते भारतासारख्या मोठ्या बाजारपेठांकडे वळत आहेत. अमेरिकेने 2022 मध्ये 34 अब्ज डॉलरहून अधिक शेती उत्पादनांची निर्यात केली होती, परंतु 2024 मध्ये ती आकडेवारी कमी झाली आहे. त्यामुळे अमेरिकन शेतमाल भारतात आणण्याचा दबाव वाढल्याचे शेतकरी संघटनांचे म्हणणे आहे. हेही वाचा: 'मुंबईत ये दुबे… समंदरात डुबे-डुबे कर मारू'; भाजप खासदार निशिकांत दुबेंच्या विधानावर राज ठाकरेंचा स्फोटक प्रत्युत्तर

शेतकरी संघटनांचा आंदोलनाचा इशारा

या पार्श्वभूमीवर ICCFM ने सरकारला इशारा दिला आहे की, जर सरकारने शेतकऱ्यांच्या हिताविरुद्ध निर्णय घेतला, तर देशभर तीव्र आंदोलन उभारले जाईल. शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी खेळ करणारे कोणतेही धोरण स्वीकार्य नाही, अशी ठाम भूमिका संघटनेने घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या आत्मनिर्भरतेचा प्रश्न

भारतीय शेतकरी आधीच अनेक अडचणींना तोंड देत आहेत. अशा वेळी परदेशी उत्पादनांना मोकळे रस्ते दिल्यास त्यांच्या स्वावलंबनावर गदा येईल. त्यामुळे केंद्र सरकारने अमेरिकेसोबतचा व्यापार करार करताना शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी जोरदार मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.