Nandani Math : नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्

Vantara Elephant Update : 'मिच्छामि दुक्कडम! वनताराने मागितली क्षमा; नांदणीत माधुरी हत्तीणीसाठी दूरस्थ केंद्र उभारण्याचा प्रस्ताव

Mahadevi-Madhuri Elephant latest news : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, नांदणी येथील जैन मठातील माधुरी हत्तीणीला अनंतर अंबानींच्या वनतारा अभयारण्यात पाठवण्यात आले. यावरून नांदणीतील आणि आजूबाजूच्या गावांमधील ग्रामस्थ, कोल्हापुरातील जनता यांनी रिलायन्स, जिओ, अनंत अंबानी, मुकेश अंबानी यांच्याविरोधात आंदोलन सुरू केले. अनेक दिवस सुरू असलेल्या या तीव्र आंदोलनामुळे अखेर वनतारा संस्थेने अधिकृत निवेदन जारी करत दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, नांदणीत योग्य सोयी-सुविधा करून त्यानंतर हत्तीणीला तेथे परत पाठवण्याची तयारी दर्शवली आहे.

नांदणी येथील जैन मठात पूजनीय असलेल्या माधुरी हत्तीणीच्या स्थलांतरावरून मोठा वाद निर्माण झाला. यानंतर वनतारा संस्थेने कोल्हापूरकर आणि जैन समाजाच्या भावना समजून घेत असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात निवेदन जारी करून स्पष्ट केले आहे की, त्यांचा सहभाग केवळ सर्वोच्च न्यायालय व मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशांपुरता मर्यादित आहे. 

वनताराच्या निवेदनानुसार, माधुरीचे स्थलांतर करण्याचा निर्णय त्यांचा नव्हता आणि त्यांनी कधीही अशा स्थलांतराची शिफारस केली नाही. संस्थेची भूमिका केवळ माधुरीची काळजी घेणे, तिला वैद्यकीय सेवा पुरवणे आणि तिच्या निवासाची योग्य व्यवस्था करणे यापुरतीच होती. 

हेही वाचा - Mahadevi Elephant Kolhapur: सरकार संपूर्ण ताकद लावणार, महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सरसावले

कोल्हापुरात परतीसाठी पूर्ण पाठिंबा नांदणी मठ आणि राज्य सरकारने माधुरीला कोल्हापुरात परत आणण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या अर्जास आम्ही पूर्ण पाठिंबा देऊ, असे वनताराने जाहीर केले. न्यायालयाच्या निर्देशानुसार वनताराचे तज्ज्ञ आणि पशुवैद्यकीय पथक तिच्या सुरक्षित व सन्माननीय परतीसाठी सर्व आवश्यक ते सहाय्य करतील. 

नांदणी परिसरात पुनर्वसन केंद्राचा प्रस्ताव वनताराने नांदणी परिसरात माधुरीसाठी एक आधुनिक पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव मांडला आहे. न्यायालय, परमपूज्य स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी आणि महाराष्ट्र शासन यांच्या मान्यतेनंतर हे केंद्र उभारले जाईल. हे केंद्र आंतरराष्ट्रीय मानकांनुसार प्राणी कल्याण आणि हत्तींच्या देखभालीसाठीच्या सर्वोत्तम पद्धतींवर आधारित असेल.

प्रस्तावित केंद्रात या सुविधा असतील - हायड्रोथेरपीसाठी विशेष तलाव - नैसर्गिक हालचालीसाठी मोकळी जागा  - वैद्यकीय उपचारांसाठी लेसर थेरपी  - सुसज्ज पशुवैद्यकीय दवाखाना  - साखळीशिवाय मोकळेपणाने फिरण्याची सोय  - रबर फ्लोरिंग मऊ वाळूचे ढिगारे  - पायाच्या दुखापती आणि दुखण्यासाठी विशेष उपचाराची सोय 

वनताराकडून दिलगिरी वनताराने निवेदनाच्या शेवटी म्हटले आहे की, जैन समुदाय आणि कोल्हापूरकरांच्या भावना आम्हाला समजतात आणि आम्ही त्या मानतो. आमचा सहभाग न्यायालयीन आदेशापुरता मर्यादित असूनही जर आमच्या कृतीमुळे कोणाला दुःख झाले असेल तर आम्ही मनापासून क्षमा मागतो. "मिच्छामी दुक्कडम."

हेही वाचा - तब्बल 14 हजार पुरुषांनी घेतला 'लाडकी बहीण' योजनेचा लाभ! सरकार गुन्हा दाखल करून पै न् पै वसूल करणार..