रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला गालबोट लाग
गुहागरमध्ये वंचितच्या उमेदवारावर प्राणघातक हल्ला
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीला गालबोट लागले. गुहागर तालुक्यातील नरवण गावात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अण्णा जाधव यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. जाधव यांना ग्रामीण रुग्णालय दाखल करण्यात आले. अण्णा जाधव यांच्या हातावर चाकू हल्ला झाला. यात त्यांच्या हाताला जखम झाली. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.