मुख्यमंत्री पदाबाबत काय म्हणाले एकनाथ शिंदे ?
मुंबई : राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान मोदी जो निर्णय घेतील तो मान्य करणार असल्याचे जाहीर केले. शिंदेंच्या या वक्तव्यामुळे ते यावेळी मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत नसतील यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचा दणदणीत विजय झाला. यानंतर पंतप्रधान मोदी यांच्याशी फोनवरुन बातचीत केली. आता पंतप्रधान जो निर्णय घेतील तो मान्य असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले. अडीच वर्षात महायुतीने जी कामगिरी केली त्यावर जनतेने विश्वास दाखवला. विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली, असेही एकनाथ शिंदे म्हणाले. त्यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले.
सामान्य माणूस अर्थात कॉमन मॅन म्हणून काम केले. पहाटेपर्यंत काम करत होतो. मविआनं थांबवलेली कामं पुन्हा सुरू केली. राज्याचा विकास केला. मी काल कार्यकर्ता होतो आणि आज कार्यकर्ता आहे. यापुढेही कार्यकर्ता म्हणून काम करणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. स्वतःला कधीही मुख्यमंत्री समजले नाही. सर्व घटकांसाठी अविश्रांत काम करत राहिलो. जे काम करण्याची संधी मिळाली त्यामुळे समाधानी आहे, खूश आहे. आम्ही बाळासाहेबांच्या विचाराने काम केले; असेही एकनाथ शिंदेंनी सांगितले. सरकार स्थापन करताना माझी अडचण होणार नाही. या संदर्भात पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना फोन करुन त्यांच्याशी बातचीत केली आहे. आता पंतप्रधान जो निर्णय घेतील त्याला शिवसेनेचा पाठिंबा असेल असे एकनाथ शिंदे म्हणाले.
एकनाथ शिंदे यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे
अडीच वर्षांत महायुतीवर लोकांनी विश्वास दाखवला - शिंदे विकास आणि कल्याणकारी योजनांची आम्ही सांगड घातली - शिंदे महाराष्ट्राच्या जनतेचे आभार मानतो - शिंदे पहाटेपर्यंत काम करायचो - शिंदे विधानसभेत मिळालेला विजय एतिहासिक - शिंदे मी कॉमन मॅन म्हणून काम केलं - शिंदे मविआनं थांबवलेली कामं आम्ही पुढे नेली - शिंदे मी काल कार्यकर्ता आणि आजही - शिंदे मी स्वत:ला कधीही मुख्यमंत्री समजलं नाही - शिंदे सर्व घटकांसाठी आम्ही काम केलंय - शिंदे अडीच वर्षाच्या कामगिरीवर मी आनंदी - शिंदे समविचारी पक्षांमुळे आम्ही जास्त प्रगती केली - शिंदे मोंदीनी अडीच वर्ष माझ्यावर विश्वास दाखवला - शिंदे सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना कळणार नाही - शिंदे राज्याला आम्ही पहिल्या क्रमांकावर आणलं - शिंदे लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ माझी ओळख - शिंदे अडीच वर्षांच्या कार्यकाळावर मी समाधानी - शिंदे रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत जनतेचं काम करेन - शिंदे लोकप्रियता मिळवण्यासाठी मी काम केलं नाही - शिंदे राज्यासाठी काही हवं असेल तर केंद्रात जावं लागतं - शिंदे नाराज होऊन रडणारे नाही, आम्ही लढणारे - शिंदे मोदी, अमित शाहांना मी फोन केला - शिंदे सरकार बनवताना माझी अडचण होणार नाही - शिंदे अभी तो नापीं है आधी जमीं अभी सारा आसमान बाकी है - शिंदे मोदी आणि शाह जो निर्णय घेतील तो मला-शिवसेनेला मान्य - शिंदे आमच्याकडून स्पीड-ब्रेकर नसेल - शिंदे भाजपाचा मुख्यमंत्री पदाबाबतचा निर्णय मान्य असेल - शिंदे लोकांचं प्रेम मिळालं हेच माझ्यासाठी सर्वकाही - शिंदे