अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये ही भाजपा

अमित ठाकरेंच्या उमेदवारीवर काय म्हणाले फडणवीस ?

मुंबई : अमित ठाकरे यांच्याविरोधात उमेदवार देऊ नये ही भाजपाची इच्छा होती. राज ठाकरे यांनी या एका जागेवर पाठींबा मागितला होता. तो त्यांना द्यायला हवा होता. मुख्यमंत्री शिंदे यांनाही हा विषय माहिती आहे. उद्धव यांच्या गटाला ती मते जाणार म्हणून उमेदवार दिला असावा; असे भाजपा नेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. अजित पवार यांच्या वरील चौकशीचा निर्णय कॉंग्रेस -राष्ट्रवादी सरकारच्या काळात झाला आहे. हे सत्य आहे. स्वर्गीय आर आर पाटील यांच्याबाबात मी काही बोलणार नाही; असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.