Ganesh Chaturthi 2025: यंदा गणेशाचा आगमन कधी? तारीख आणि शुभ मुहूर्त घ्या जाणून
Ganesh Chaturthi 2025: देशातील अनेक राज्यांमध्ये विशेषतः महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि गोव्यात गणेश चतुर्थीचा सण अत्यंत आस्था, भक्ती आणि थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी लोक आपल्या घरात विघ्नहर्ता गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना करतात. तसेच 10 दिवस गणरायाची उपासना करतात. यामुळे संपूर्ण घरातील वातावरण भक्तीमय होते.
गणेश चतुर्थी 2025 मध्ये कधी आहे?
पंचांगानुसार, भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 26 ऑगस्ट 2025 रोजी दुपारी 01:54 वाजता सुरू होणार असून ती 27 ऑगस्ट रोजी 03:44 वाजेपर्यंत चालेल. हिंदू परंपरेनुसार उदय तिथी हीच महत्वाची मानली जाते, त्यामुळे यंदाची गणेश चतुर्थी 27 ऑगस्ट 2025 बुधवार या दिवशी साजरी केली जाणार आहे.
गणेश चतुर्थी पूजेसाठी शुभ मुहूर्त:
स्थापनेचा मुहूर्त: सकाळी 11:23 ते दुपारी 01:54 (अवधिः 2 तास 31 मिनिटे) विसर्जन तारीख: 5 सप्टेंबर 2025 (अनंत चतुर्दशी)
हेही वाचा - Nag Panchami 2025: नागाला दूध पाजून पुण्य नाही, पाप कमावताय; कारण जाणून घ्या
गणेश चतुर्थीचे धार्मिक महत्त्व -
गणेश चतुर्थीला भगवान गणेशांचा जन्मदिवस मानला जातो. गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य, बुद्धीचे दाता, विघ्नांचे नाश करणारे देव मानले जातात. या दिवशी भक्तगण घरगुती तसेच सार्वजनिक ठिकाणी गणपतीची मूर्ती आणून पूजन करतात. गणरायाला मोदक, करंजी, पूरणपोळी यांसारखे पारंपरिक पदार्थ नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात. काही कुटुंबे 1, 3, 5 किंवा 10 दिवस गणेशाची पूजा करून मग अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाचे विसर्जन करतात.
हेही वाचा - Mangalagauri vrat 2025: मंगळागौरी व्रत म्हणजे नेमकं काय? जाणून घ्या योग्य पूजा विधी आणि महत्वाची माहिती
मुंबई, पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद अशा प्रमुख शहरांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणेश चतुर्थीच्या तयारीला सुरुवात केली आहे. 10 दिवसांच्या या उत्सवात भव्य मूर्ती, सजावट, सांस्कृतिक कार्यक्रम, समाजोपयोगी उपक्रम राबवले जातात.
(Disclaimer: वरील सर्व माहिती केवळ माहितीच्या उद्देशाने वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा कोणत्याही प्रकारची जबाबदारी स्वीकारत नाही.)