Holi Stock Market Holiday: होळीच्या दिवशी शेअर बाजार सुरू राहणार का? NSE-BSE ला कधी सुट्टी असेल? जाणून घ्या
Holi Stock Market Holiday: या महिन्यात, हिंदू धर्मातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक असलेला रंगांचा सण, होळी येत आहे. या वर्षी होळी 14 मार्च 2025 रोजी मोठ्या उत्साहात साजरी केली जाईल. अनेकांनी होळीच्या सणासाठी तयारी देखील सुरू केली आहे. पण शेअर बाजाराशी जोडलेल्या लोकांच्या मनात प्रश्न आहे की, 14 मार्च रोजी शेअर बाजार सुरू राहील की नाही? खरंतर, शेअर बाजार सोमवार ते शुक्रवार खुला असतो, पण यावेळी होळी शुक्रवारी येत आहे. अशा परिस्थितीत, प्रश्न उद्भवतो की या दिवशी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजमध्ये शेअर्स खरेदी-विक्रीशी संबंधित काम केले जाईल की नाही?
होळीच्या दिवशी शेअर बाजारा सुरू राहणार का?
बीएसई आणि एनएसईच्या अधिकृत वेबसाइटनुसार, 14 मार्च रोजी होळीच्या दिवशी शेअर बाजार पूर्णपणे बंद राहील. म्हणजेच, या दिवशी इक्विटी, इक्विटी डेरिव्हेटिव्ह्ज, एसएलबी सेगमेंट, करन्सी डेरिव्हेटिव्ह्ज आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स ईजीआर सेगमेंटमध्ये कोणतेही व्यवहार होणार नाहीत. या दिवशी गुंतवणूकदार कोणतेही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकणार नाहीत.
होळीच्या सणानंतर शेअर मार्केट कधी सुरू होईल?
होळीच्या सुट्टीनंतरच्या पुढील व्यावसायिक दिवसापासून शेअर बाजारातील सामान्य व्यवहार पुन्हा सुरू होतील. सकाळी 9:00 ते 9:15 पर्यंत प्री-ओपन सत्र असेल आणि नियमित व्यवहार सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 पर्यंत असतील.
या वर्षात शेअर बाजार 'इतके' दिवस बंद राहील -
होळीच्या सणानंतर, शेअर बाजाराची पुढील सुट्टी 31 मार्च 2025 रोजी ईद-उल-फित्र (रमजान ईद) निमित्त असेल. यानंतर, 10 एप्रिल ला महावीर जयंती, 14 एप्रिल रोजी डॉ. बाबा साहेब आंबेडकर जयंती आणि 18 एप्रिल रोजी गुड फ्रायडे या दिवशी एप्रिल महिन्यात 3 दिवस शेअर बाजार बंद राहील. याशिवाय मे महिन्यात फक्त एक दिवस सुट्टी असेल. खरंतर, दरवर्षी 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त सार्वजनिक सुट्टी असते. अशा परिस्थितीत, या दिवशीही शेअर बाजार बंद राहील. तथापि, जून आणि जुलैमध्ये शेअर बाजाराला सुट्ट्या नाहीत.
हेही वाचा - Insider Trading नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल SEBI चा Nestle ला इशारा; काय आहे प्रकरण? वाचा
ऑगस्टमध्ये शेअर बाजार 2 दिवस बंद राहणार -
15 ऑगस्ट: स्वातंत्र्य दिन 27 ऑगस्ट: गणेश चतुर्थी
ऑक्टोबरमध्ये शेअर बाजार 3 दिवस बंद राहणार - 02 ऑक्टोबर: गांधी जयंती 21 ऑक्टोबर: दिवाळी (मुहूर्त व्यापारासाठी बाजार 1 तासासाठी खुले राहतील) 22 ऑक्टोबर: दिवाळी बलिप्रतिपदा
तथापि, नोव्हेंबर महिन्यात श्री गुरु नानक देव यांच्या प्रकाश गुरुपौर्णिमेमुळे 5 तारखेला शेअर बाजार बंद राहील आणि डिसेंबरमध्ये, 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशीही शेअर मार्केट बंद असणार आहे.