गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही युवासेनेने सिनेटवर

अधिसभा निवडणुकीत युवासेनेची आघाडी

मुंबई : राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी चर्चेत असलेल्या मुंबई विद्यापीठाच्या सिनेटचा निकाल लागला आहे. यामध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखालील युवासेनेने पुन्हा एकदा बाजी मारल्याचं दिसून आलं. आतापर्यंत पाच उमेदवार विजयी झाले असून इतर पाच उमेदवार विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे गेल्या निवडणुकीप्रमाणे यंदाही युवासेनेने सिनेटवरील आपलं वर्चस्व कायम ठेवल्याचं दिसून येतंय. 

 

सात जागांवर युवासेना आघाडीवर : 

  • खुल्या प्रवर्गातही युवासेनेचे प्रतिनिधी विजयी
  • युवासेनेचे प्रदीप सावंत, मिलिंद साटम विजयी
  • युवासेनेचे शशिकांत झोरे, धनराज कोहचाडे विजयी
  • शीतल देवरुखकर एससी प्रवर्गातून विजयी 
  • ओबीसी प्रवर्गातून मयूर पांचाळ विजयी