विराट कोहलीची फूड डायरी- 'हे' आहेत आवडते रेस्टॉरंट्स!
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या खेळाने लाखोंच्या हृदयावर राज्य करणारा विराट कोहली फक्त खेळातच नव्हे, तर खाद्यप्रेमी म्हणूनही ओळखला जातो. जगभर प्रवास करताना विविध देशांतील वेगवेगळ्या स्वादांचा अनुभव घेण्याची संधी त्याला मिळते. दिल्लीचा हा स्टार क्रिकेटपटू भारतीय स्ट्रीट फूडचा मोठा चाहता असला तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याची खास आवड असलेली काही ठिकाणे आहेत. लंडनपासून ऑस्ट्रेलियापर्यंत, विराटची आवडती रेस्टॉरंट्स कोणती आहेत, पाहूया!
1) जामावर, लंडन – अस्सल भारतीय चवीचं ठिकाण लंडनमधील हे प्रीमियम भारतीय रेस्टॉरंट कोहली आणि अनुष्का शर्मा यांच्यासाठी खास आहे. इंग्लंड दौऱ्यावर असताना हे दोघे येथे चविष्ट जेवणाचा आस्वाद घेतात. प्रसिद्ध शेफ सुरेंदर मोहन यांनी या दोघांचे येथे मनःपूर्वक स्वागत केले होते. विविध मसाल्यांचे उत्तम मिश्रण आणि शाही भारतीय पदार्थ यामुळे जामावर हे विराटच्या टॉप लिस्टमध्ये आहे.
2) दिल्ली से, मुंबई दिल्लीच्या छोले भटुरेची चव जगात कुठेही मिळणं कठीण, पण मुंबईतील ‘दिल्ली से’ हे रेस्टॉरंट विराटच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहे. छोले भटुरे आणि उत्तर भारतीय पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. विराटचा आवडता पदार्थ येथे असल्यानं तो इथे वारंवार भेट देतो.
3) वन 8 कम्यून, मुंबई – कोहलीचं स्वतःचं रेस्टॉरंट! विराट कोहलीने स्वतः उघडलेले वन८ कम्यून हे त्याच्या आवडीच्या पदार्थांचं ठिकाण. किशोर कुमार यांच्या ऐतिहासिक बंगल्यात वसलेले हे रेस्टॉरंट हेल्दी आणि चविष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. येथे शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही प्रकारांचे पदार्थ मिळतात. कोहलीला येथे ‘प्रोटीन बाऊल्स’, ‘स्मूदीज’ आणि पौष्टिक जेवण विशेष आवडते.
हेही वाचा : Ind vs Pak : पाकचे वस्त्रहरण करत टीम इंडियाने घेतला बदला, ‘किंग’ कोहलीची नाबाद शतक खेळी
4) टेंड्रिल, लंडन – शाकाहारींचं नंदनवन विराट आणि अनुष्का शर्मा शाकाहारी आहाराचे मोठे चाहते आहेत. लंडनमधील टेंड्रिल हे रेस्टॉरंट आधुनिक आणि इनोव्हेटिव्ह शाकाहारी पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. ताज्या आणि नैसर्गिक घटकांनी बनवलेले पदार्थ येथे मिळतात. निरोगी आणि हेल्दी डाएट ठेवणाऱ्या विराटसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे.