Benefits of Eating Bananas : केळीतील नैसर्गिक पोषक

Benefits of Eating Bananas : दररोज 2 केळी खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Benefits of Eating Bananas : दररोज 2 केळी खाण्याचे 'हे' आहेत जबरदस्त फायदे

Benefits of Eating Bananas : केळं हे भारतातील सर्वाधिक लोकप्रिय आणि पौष्टिक फळांपैकी एक आहे. यामध्ये असलेले नैसर्गिक पोषक घटक शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असतात, यामुळं याला 'सुपरफूड' देखील म्हणतात. तुम्ही जर सलग एक महिना रोज दोन केळी खाल्ली तर तुमच्या शरीरात काही सकारात्मक बदल दिसू शकतात. चला तर मग केळी खाल्यानंतर होणाऱ्या फायद्या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात...

  1. एनर्जी वाढते - केळ्यामध्ये फ्रक्टोज, ग्लुकोज आणि सुक्रोज यांसारखी नैसर्गिक साखर असते. ती त्वरित एनर्जी देते. रोज दोन केळी खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर स्फूर्ती वाटेल आणि थकवा जाणवणार नाही.    
  2. पचन क्रिया मजबूत होईल -केळ्यात भरपूर प्रमाणात फायबर असतो. जो पचनासाठी उपयुक्त असतो. रोज केळं खाल्ल्यास बद्धकोष्ठता टाळता येते आणि पचन क्रिया आरोग्यदायी राहते. पचन क्रिया सुधारल्यामुळे अन्नातील पोषणतत्त्वे योग्य प्रकारे शरीरात शोषली जातात.

  3. हृदयाचे आरोग्य सुधारेल - केळ्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. ज्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. नियमित केळं खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहते.

  4. रोगप्रतिकारशक्ती वाढेल - केळ्यात व्हिटॅमिन C असते. जे शरीराच्या प्रतिकारशक्तीसाठी महत्त्वाचे आहे. हे अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध असल्याने सर्दी, खोकला आणि संसर्गजन्य आजारांपासून बचाव होतो.

  5. त्वचेचा निखार वाढेल - केळ्यात अँटीऑक्सिडंट्स असतात. त्वचेच्या पेशींना ते पुनरुज्जीवित करतात. रोज केळं खाल्ल्यास त्वचेला नैसर्गिक चमक येते आणि सुरकुत्या कमी होतात. त्यामुळे तरुण दिसण्यासाठी हे उपयुक्त ठरू शकते.

  6. मेंदू तल्लख होईल - केळ्यात व्हिटॅमिन B6 असते. ज्यामुळे मेंदूच्या कार्यक्षमतेस वाढ होण्यास मदत करते. स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि मेंदूच्या आरोग्यासाठी रोज केळं खाणे फायदेशीर ठरते. विद्यार्थ्यांनी आणि मानसिक मेहनत घेणाऱ्या व्यक्तींनी केळीचा आहारात समावेश करावा.

  7. वजन नियंत्रणात राहील - केळ्यात फायबर अधिक असल्यामुळे पोट भरल्यासारखे वाटते आणि वारंवार भूक लागत नाही. त्यामुळे जास्त खाणे टाळले जाते. ज्यांना वजन कमी करायचे आहे, त्यांच्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

  8. हाडे मजबूत होतील - केळ्यात कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते. ते हाडांसाठी आवश्यक आहे. नियमित सेवन केल्यास हाडांची घनता वाढते आणि ऑस्टिओपोरोसिससारख्या आजारांचा धोका कमी होतो.

  9. मानसिक तणाव कमी होईल - केळ्यात ट्रिप्टोफॅन असते. ते सेरोटोनिन म्हणजेच 'हॅपी हार्मोन'च्या निर्मितीस मदत करते. त्यामुळे तणाव आणि नैराश्य कमी होते आणि मन आनंदी राहते.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)