Chanakya Niti : चुकूनही या 3 गोष्टींची लाज बाळगू नये; अन्यथा, होते नुकसान
Chanakya Niti For Life : सामान्यत: लाजाळूपणा हा स्त्रियांचा अलंकार मानला जातो. परंतु, अनावश्यक लाजाळूपणा, पुरुष आणि महिला अशा दोघांसाठीही एक गुण बनण्याऐवजी, अनेक वेळा अपयशाचे कारण बनतो. आयुष्यात अनेक वेळा, एखाद्या व्यक्तीला केवळ संकोचातून अशा काही गोष्टी करण्यास लाज वाटते, ज्यामुळे त्याचा यशाचा मार्ग आणखी दूर जातो. आज केवळ महिलाच नाही तर, पुरुषांनाही काही गोष्टींबद्दल लाज वाटत असते. अशा परिस्थितीत, चाणक्य यांनी त्यांच्या नीतिमत्तेत मानवी जीवनाच्या यशासाठी अनेक मौल्यवान सूचना दिल्या आहेत. त्यांनी सांगितले आहे की कोणत्या 3 गोष्टींसाठी पुरुष आणि महिलांनी अजिबात लाज वाटून घेऊ नये.
पैसे कमवणे आचार्य चाणक्य यांच्या मते, जर एखाद्या व्यक्तीला पैशाच्या व्यवहारात लाज वाटत असेल तर, त्याचे पैशाचे नुकसान होऊ शकते. पैसे कमवण्यासाठी कोणतेही छोटे किंवा मोठे कोणतेही चांगले काम करण्यात लाजू नये. पैशांशी संबंधित बाबींमध्ये संकोच करणे एखाद्या व्यक्तीला हानी पोहोचवू शकते, असे आचार्य चाणक्यांचे म्हणणे होते. जसे की, पैसे परत मागण्यास संकोच करणे किंवा पैसे उधार घेण्यास लाज वाटणे, दोन्ही प्रकरणांमध्ये व्यक्तीचे नुकसान होऊ शकते. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्तीला चांगल्या, आरामदायी आणि समृद्ध जीवनासाठी पैशाची आवश्यकता असते. व्यक्तीची प्रत्येक गरज थेट पैशाशी संबंधित असते. तेव्हा, यात अयोग्य प्रकारे लाज बाळगणे हे स्वतःसाठीच नुकसानकारक ठरते.
हेही वाचा - Chanakya Niti : तुमच्या प्रियकर/प्रेयसीचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? फसवणूक करणारी व्यक्ती कशी ओळखाल?
शिक्षण शिक्षण घेण्यात कधीही लाज वाटता कामा नये. जर एखादी व्यक्ती काहीतरी नवीन शिकण्यास संकोच करत असेल तर, ती नेहमीच अज्ञानी राहील. म्हणून, तुमच्या शिक्षकांना प्रश्न विचारण्यास कधीही संकोच करू नका. मनात कोणत्याही प्रकारची शंका येताच, ती लगेच समजून घेण्यासाठी प्रश्न विचारा.
जेवण बऱ्याच लोकांना सार्वजनिक ठिकाणी जेवण्याची लाज वाटते. परंतु भूक भागवणे ही व्यक्तीचा अधिकार आणि नैसर्गिक प्रक्रिया आहे. भूक लागल्यावरच खा आणि तुमच्या शेजारी बसलेल्या लोकांची काळजी करू नका. लक्षात ठेवा, जर तुम्हाला खाण्याची लाज वाटत असेल तर तुम्ही उपाशी राहू शकता. न जेवल्यामुळे तुमचेच नुकसान होते. इतरांचे नाही.
हेही वाचा - Chanakya Niti : एकटे राहण्याची भीती वाटते? सुचेनासं होतं? चाणक्यनीतीत सांगितलेत एकटे असण्याचे फायदे
(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. याद्वारे जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा हमी देत नाही.)