Chia Seeds Water: चिया सीड वॉटरचे सहा जबरदस्त फायदे आणि घरी बनवण्याची सोपी रेसिपी; जाणून घ्या
Chia Seeds Water: आरोग्यदायी जीवनशैलीत नवनवीन सुपरफूड्सला महत्त्व मिळत आहे. त्यात चिया सीड वॉटर (Chia Seed Water) ही एक लोकप्रिय हेल्दी ड्रिंक म्हणून झपाट्याने ओळख मिळवते आहे. चिया सीड्स हे सॅल्व्हिया हिस्पॅनिका (Salvia hispanica) या झाडाचे लहान काळे किंवा पांढरे बी आहेत.
हे बी ओमेगा-3 फॅटी अॅसिडस्, फायबर, प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिज पदार्थांनी समृद्ध असतात. पाण्यात भिजवल्यावर हे बी जेली सारखे फुगतात आणि त्यातून तयार होणारे पेय शरीराला हायड्रेशनसह अनेक फायदे देऊ शकते.
1. पचन सुधारते
चिया सीड्समध्ये मुबलक प्रमाणात फायबर असते. एक आउंस (सुमारे 28 ग्रॅम) बियांमध्ये जवळपास 9.8 ग्रॅम फायबर असते. हे फायबर पचनाला मदत करते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळवून देते आणि आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियाला पोषण पुरवते. हेही वाचा: Fenugreek Water: मेथीच्या पाण्याने दूर होऊ शकतात 5 प्रमुख आजार, जाणून घ्या सेवनाची सोपी पद्धत 2. वजन नियंत्रणात मदत
फायबर आणि प्रोटीन यांचा उत्तम स्रोत असल्याने चिया सीड वॉटर भूक भागवते आणि पोट दीर्घकाळ भरल्यासारखे वाटते. त्यामुळे वजन कमी करायचे असल्यास किंवा ते टिकवायचे असल्यास हा पेय उपयुक्त ठरू शकतो.
3. हृदयाचे आरोग्य सुधारते
चिया सीड्समध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स, ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् आणि फायबर हृदयविकाराचा धोका कमी करतात. नियमित सेवनामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते तसेच कोलेस्टेरॉल पातळी सुधारते.
4. सूज आणि वेदना कमी होण्यास मदत
शरीरातील इन्फ्लमेशन (दाह) कमी करण्यासाठी ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् प्रभावी मानले जातात. त्यामुळे संधिवात किंवा हृदयविकाराशी संबंधित सूज कमी करण्यात चिया सीड वॉटर मदत करू शकते. हेही वाचा: Fennel Seeds Benefits: बडीशेपची 'ही' खास जात मासिक पाळीच्या वेदनांपासून देईल आराम; जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत 5. रक्तातील साखर नियंत्रित ठेवते
चिया सीड्समधील द्रवणीय फायबर कार्बोहायड्रेटचे शोषण कमी करते. त्यामुळे जेवणानंतर रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही. ओमेगा-३ इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतो, ज्यामुळे मधुमेह नियंत्रणात राहतो.
6. त्वचेसाठी उपयुक्त
चिया सीड्समधील पोषक घटक त्वचेला नैसर्गिक आर्द्रता देतात. ओमेगा-3 फॅटी अॅसिडस् त्वचेवरील अल्ट्राव्हायोलेट किरणांमुळे होणारे नुकसान कमी करू शकतात. शिवाय पुरेसा हायड्रेशन मिळाल्यास त्वचा तजेलदार राहते.
चिया सीड वॉटर कसे बनवायचे?
-
1 कप पाण्यात 1 ते 2 चमचे चिया सीड्स घाला.
-
5 ते 30 मिनिटे भिजू द्या.
-
हवे असल्यास लिंबाचे तुकडे, काकडी, आलं किंवा पुदिना घालून चव वाढवा. हे पेय लगेच प्यावे, जास्त वेळ साठवू नये.
लक्षात ठेवण्यासारखे
चिया सीड्स सुरक्षित असले तरी अतिप्रमाणात घेतल्यास गॅस, पोटफुगी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. रक्तदाब किंवा मधुमेहाची औषधे घेणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच हे पेय आहारात समाविष्ट करावे.
चिया सीड वॉटर हे आरोग्यासाठी एक सोपे, नैसर्गिक आणि पोषणमूल्यांनी भरलेले पेय आहे. योग्य प्रमाणात सेवन केल्यास हे पचन सुधारते, वजन नियंत्रित ठेवते, हृदय व त्वचेसाठी फायदेशीर ठरते आणि एकूण आरोग्याला सकारात्मक परिणाम देते. (Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)