Clove and Garlic Water: लवंग-लसूण पाण्याचे गुपित; छोटासा उपाय, मोठे आरोग्य फायदे
Clove and Garlic Water: लवंग आणि लसूण या दोन गोष्टी भारतीय स्वयंपाकघरात हमखास आढळतात. पण या मसाल्यांचा उपयोग फक्त चव वाढवण्यासाठी होत नाही, तर आरोग्यासाठीही हे दोन्ही घटक मोठे फायदेशीर ठरतात. आयुर्वेदात लवंग आणि लसूण यांना नैसर्गिक औषध मानले गेले आहे. या दोन्हींचा एकत्रित वापर शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो, पचन सुधारतो, वजन कमी करण्यात मदत करतो आणि अनेक आजारांपासून बचाव करतो.
रोगप्रतिकारक शक्तीसाठी उपयुक्त
लवंगामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-ऑक्सिडंट गुण असतात, तर लसणामध्ये अँटी-व्हायरल व डिटॉक्सिफाइंग गुणधर्म असतात. या दोन्हींच्या पाण्याचे सेवन केल्यास शरीराची इम्युनिटी मजबूत राहते. विशेषतः हवामानातील बदलामुळे होणारे सर्दी-जुकाम यापासून हे मिश्रण संरक्षण देते. हेही वाचा: Health Tips: आवळा खाताय मग सावधान...., 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये
पचनसंस्थेला आराम
लवंगाचा पाणी पचनाशी संबंधित त्रास, गॅस, अॅसिडिटी कमी करण्यास मदत करतो. दुसरीकडे लसूण पचन एन्झाईम सक्रिय करून जेवण व्यवस्थित पचण्यास मदत करतो. सकाळी रिकाम्या पोटी लवंग-लसणाचे पाणी प्यायल्याने पोट हलके वाटते आणि दिवसभर ऊर्जा टिकून राहते.
हृदयासाठी फायदेशीर
उच्च रक्तदाब आणि कोलेस्ट्रॉल ही आजकालची मोठी समस्या आहे. लसणामध्ये रक्तदाब संतुलित ठेवण्याचे गुण आहेत तसेच तो खराब कोलेस्ट्रॉल कमी करतो. लवंग रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे लवंग-लसणाचे पाणी हृदयाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.
वजन कमी करण्यात मदत
वजन कमी करण्यासाठी लोक अनेक घरगुती उपाय करतात. लवंग आणि लसूण यांचे पाणी मेटाबॉलिझम वाढवते आणि चरबी जळण्याची प्रक्रिया जलद करते. नियमितपणे हे पाणी घेतल्यास वजन कमी करण्यास मदत होते. हेही वाचा: How to Store Coriander: फ्रीजशिवाय आठवडाभर कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी जाणून घ्या 'या' 5 सोप्या ट्रिक्स
शरीर डिटॉक्स आणि त्वचेच्या सौंदर्यासाठी उपयुक्त
लसणामुळे शरीरातील घातक टॉक्सिन्स बाहेर पडतात, तर लवंगाचे अँटी-ऑक्सिडंट गुण त्वचेला निरोगी आणि चमकदार ठेवतात. नियमित सेवनाने पिंपल्स व स्किन इंफेक्शनपासून मुक्ती मिळते.
कसा करावा वापर?
दोन कप पाण्यात 2 लसूण पाकळ्या आणि 3लवंगा घालून उकळून घ्या. हे पाणी अर्धे होईपर्यंत आटू द्या. नंतर गाळून कोमट स्वरूपात सकाळी रिकाम्या पोटी प्या. हा सोपा उपाय तुमचे आरोग्य सुधारण्यात मोठी भूमिका बजावतो.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)