लहान मुलांचे लक्ष विचलित होणे आणि एका जागी बसून को

Parenting Tips : मुलांचे मन एकाग्र होण्यासाठी या खास टिप्स; बुद्धी होईल तीक्ष्ण

Parenting Tips : मुले बर्‍याचदा खेळ, टीव्ही किंवा मोबाइलमध्ये इतकी हरवून जातात की, ती अभ्यासाकडे किंवा महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत. परंतु, प्रत्येक वेळी रागावणे किंवा शिक्षा करण्याने किंवा जबरदस्ती करण्याने मुलाचे लक्ष केंद्रित होऊ शकत नाही. मुलांना प्रेरणा देणाऱ्या आणि समजूतदारपणा शिकवणाऱ्या मार्गदर्शनाची खरी आवश्यकता असते.

लहान मुलांचे लक्ष विचलित होणे आणि एका जागी बसून कोणतेही काम करण्यास टाळाटाळ करणे हा मुलांच्या वयाचा एक भाग आहे. परंतु, योग्य पद्धतींचा अवलंब करून आपण मुलाला सुधारू शकता. कारण, फक्त रागावणे किंवा शिक्षा केल्याने मूल अधिक हट्टी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत, ज्यामुळे मुलांची लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढेल आणि त्यांचा मेंदूही तल्लख होईल.

प्रोत्साहन द्या

मुलांनी अभ्यास किंवा एखाद्या कामाकडे लक्ष केंद्रित करावे, यासाठी  रागावण्याऐवजी त्यांच्या चांगल्या गोष्टीचे कौतुक करून त्यांना प्रोत्साहन द्या. यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक वेळी रागावणे किंवा शिक्षा केल्याने मूल सुधारण्याऐवजी अधिक चिडचिडे होऊ शकते. त्याऐवजी जेव्हा ते चांगले काम करतात, तेव्हा त्याचे कौतुक करा. त्यामुळे मुलांची स्वतःहून अधिक चांगले काहीतरी करण्याची इच्छा निर्माण होईल.

हेही वाचा - प्रत्येक गोष्टीवर मुलांची 'वाहवा' करणे थांबवा; नाहीतर होतील गंभीर परिणाम

पालकांनी संयम राखावा

मुलांचे लक्ष वाढविण्यासाठी पालकांनी थोडे संयमाने राहिले पाहिजे. कारण, मुले हळू हळू शिकतात. म्हणूनच, तो पुन्हा पुन्हा रागावून नव्हे; तर, प्रेम आणि शांतपणे सांगण्यामुळेच मुले अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करण्यास शिकतील. मुलांना त्वरित सर्वकाही समजत नाही. त्यामुळे त्यांना पुन्हा-पुन्हा रागावण्याचा काहीही फायदा नाही. मूल केवळ प्रेम आणि वेळेच्या वेळी समजावून सांगण्यामुळेच लक्ष केंद्रित करण्यास शिकेल.

छोट्या-छोट्या भागांमध्ये काम द्या

याव्यतिरिक्त, मुलांवर दबाव आणू नका. जर आपण त्यांना जास्त प्रमाणात गृहपाठ दिला किंवा एकाच वेळी खूप कामं करायला सांगितली तर मूल चिंताग्रस्त होईल किंवा घाबरून जाईल. म्हणूनच, जर आपण छोट्या-छोट्या भागांमध्ये त्याला काम दिले तर, ते त्याच्यासाठी सोपे होईल आणि ते मनापासून ते काम करेल. काम लहान भागांमध्ये विभाजित केलेला अभ्यास किंवा काम मूल एकामागून एक लक्ष पूर्ण केंद्रत करून करू शकते.

शिक्षण मनोरंजक आणि मजेदार बनवा

मुलाचे लक्ष केंद्रित करण्यासाठी, मुलांचे शिक्षण मनोरंजक आणि मजेदार बनवा. कंटाळवाण्या गोष्टींमध्ये, मुले लक्ष केंद्रित करण्यास सक्षम नसतात आणि ती टाळाटाळही करतात. अशा परिस्थितीत मुलांच्या शिक्षणामध्ये खेळ, कथा किंवा रंग जोडा. यामधून शिकणे हे अधिक मजेदार दिसेल आणि मूल स्वत:वर लक्ष केंद्रित करून गोष्टी शिकेल.

निरोगी, सकस, चौरस आहार

मुलाचे शिक्षण आणि फोकसबरोबरच सर्वात महत्त्वाचे म्हणजे निरोगी आहार. जर मुले वारंवार जंक फूड खात असतील तर, त्यांचा मेंदू गतीने काम करणार नाही. म्हणून मुलांना हिरव्या भाज्या, फळे, अंडी, कडधान्ये आदी पदार्थ द्या. जेवण किंवा कोणताही खाण्याचा पदार्थ जास्त गोड, नमकीन, चटक-मटक, तिखट असू नये. अशा पद्धतीने योग्य आहार दिल्यास मुलांचा मेंदू चांगल्या प्रकारे काम करू लागेल आणि लक्ष केंद्रित करणेदेखील वाढेल.

मुलांसोबत खेळावे,फिरावे

मुलांचे लक्ष केंद्रित करणे वाढविण्यासाठी त्यांचा स्क्रीनवर जाणारा वेळ नियंत्रित करा. मुलांकडून टीव्ही आणि मोबाइल पाहणे पूर्णपणे थांबविणे कठीण आहे. परंतु, त्यांनी किती वेळ आणि काय पहावे, हे आपणच ठरवले पाहिजे. शिवाय, मुलांनी स्क्रीनपासून दूर राहावे, यासाठी मुलांसोबत स्वतःही खेळावे. त्यांना स्वतः फिरायला न्यावे. त्यांना अधिकाधिक चांगल्या गोष्टी समजतील, अशा ठिकाणी फिरायला न्यावे. यामुळे पालकांचे मुलांसोबतचे नाते अधिक घट्ट बनेल. तसेच, मुलांना कुटुंबातील इतर मुलांसोबत, मित्र-मैत्रिणींसोबत खेळण्यास आणि समवयस्कांमध्ये मिसळण्यास प्रवृत्त करावे. त्यांना बाहेर खेळण्यासाठी, पुस्तके वाचण्यासाठी किंवा कोणत्याही अतिरिक्त क्रियाकलापांसाठी प्रेरणा द्या.

झोपेचे वेळापत्रक ठरवा

या सर्वांव्यतिरिक्त, मुलाचे लक्ष वाढविण्यासाठी त्यांची झोपेची वेळ ठरवा. मुलांसाठी 9 ते 12 तासांची झोप आवश्यक आहे. जर, झोप पूर्ण झाली नाही तर मूल दिवसभर चिडचिडे राहील आणि कोणतेही काम व्यवस्थित करू शकणार नाही. म्हणून, झोपेची वेळ ठरवा. जेणेकरून, दुसऱ्या दिवशी मुले योग्य प्रकारे अधिक चांगल्या प्रकारे लक्ष केंद्रित करू शकतील.

हेही वाचा - आईचा राग आवश्यकच; पण छोट्या-छोट्या गोष्टींत अति रागावण्याने चिमुकल्यांना बसतो मोठा धक्का

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. याद्वारे जय महाराष्ट्र कोणताही दावा करत नाही किंवा हमी देत नाही.)