खुशखबर ! Flipkart आणि Amazon चा बंपर सेल लवकरच होणार सुरु, तारीख जाहीर
या वर्षीचा सर्वात मोठा सेल लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे आता कोणतीही मोठी गरजेची वस्तू खरेदी करायची असेल तर तयार राहा. कारण फ्लिपकार्ट सेलची तारीख जाहीर झाली आहे. सेल दरम्यान, अॅपल, सॅमसंग, मोटोरोला ब्रँडचे स्मार्टफोन बंपर डिस्काउंटसह विकले जातील. सेलसाठी तयार केलेली मायक्रोसाइट देखील लाईव्ह करण्यात आली आहे जिथे सेलमध्ये उपलब्ध असलेल्या ऑफर्सची माहिती दिली जात आहे.
फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल समोर आलेल्या माहितीनुसार, फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होईल, पण हा सेल कधीपर्यंत सुरू राहील? ही माहिती देण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे फ्लिपकार्टच्या काही तास आधी, अमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलची तारीख देखील जाहीर केली आहे. रिपोर्टनुसार, फ्लिपकार्टप्रमाणेच, अमेझॉन सेल देखील 23 सप्टेंबरपासून सुरू होईल.
नेहमीप्रमाणे, फ्लिपकार्ट प्लस आणि ब्लॅक सदस्यांना सेलमध्ये लवकर प्रवेश मिळेल. कंपनीने सेलपूर्वी माहिती दिली आहे की ग्राहकांना सेल दरम्यान स्टील डील्स, मर्यादित वेळेच्या ऑफर्स आणि फेस्टिव्ह रश अव्हर्स सारख्या आकर्षक ऑफर्स मिळतील. फ्लिपकार्टने या सेलसाठी अॅक्सिस बँक आणि आयसीआयसीआय बँकेसोबत भागीदारी केली आहे, म्हणजेच सेल दरम्यान या बँक कार्ड वापरून केलेल्या पेमेंटवर तुम्ही अतिरिक्त 10% बचत करू शकता.
अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल अमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 23 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. अमेझॉन प्राइम सबस्क्राइबर्सना सेलमध्ये लवकर ॲक्सेस मिळेल. स्मार्टफोन, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठ्या प्रमाणात सूट असेल. सॅमसंग आणि अॅपल सारखे ब्रँड डील देतील. या काळात वायरलेस इअरबड्स आणि स्पीकर्ससह, ग्राहक टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन आणि इतर घरगुती उपकरणांवर सूट मिळवू शकतात.