आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत झटपट तयार होणाऱ्या पदा

दोन मिनिटांत आरोग्य धोक्यात! इंस्टंट नूडल्स खाणं किती घातक?

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत झटपट तयार होणाऱ्या पदार्थांची मागणी वाढली आहे. त्यात इंस्टंट नूडल्स सर्वाधिक लोकप्रिय आहेत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच यांची चव आवडते. फक्त दोन मिनिटांत तयार होणाऱ्या या नूडल्समुळे वेळ वाचतो, पण तुमच्या आरोग्यावर याचे दुष्परिणाम होऊ शकतात. रोजच्या आहारात याचा समावेश करणे किती धोकादायक आहे, हे जाणून घेऊया.

न्यूडल्समध्ये असणारे घटक:  इंस्टंट नूडल्समध्ये मैदा, सोडिअम, प्रिझर्व्हेटिव्ह्स आणि ट्रान्स फॅट मोठ्या प्रमाणावर असतात. हे घटक शरीरासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतात. नियमितपणे नूडल्स खाल्ल्यास पुढील आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

हेही वाचा : Mahashivratri 2025: महाशिवरात्रीला बनवा बटाट्यापासून चटपटीत पदार्थ

1) हृदयविकाराचा धोका वाढतो नूडल्समध्ये असलेले ट्रान्स फॅट आणि जास्त प्रमाणातील सोडिअम हृदयाच्या आरोग्यासाठी अपायकारक असतात. यामुळे ब्लड प्रेशर वाढू शकतो, कोलेस्टेरॉल लेव्हल असंतुलित होतो आणि हृदयरोगाचा धोका निर्माण होतो.

2) लठ्ठपणा वाढतो  इंस्टंट नूडल्समध्ये फायबर नसते, मात्र कार्बोहायड्रेट आणि फॅट भरपूर असतात. त्यामुळे हे खाल्ल्यानंतर पुन्हा लवकर भूक लागते आणि जास्त खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते.

3) पचनक्रिया बिघडते नूडल्समध्ये असलेले प्रिझर्व्हेटिव्ह्स आणि प्रोसेस्ड घटक पचनसंस्थेवर वाईट परिणाम करतात. त्यामुळे अपचन, गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

हेही वाचा : लागोपाठ शिंका येण्याचं कारण आणि उपाय

4) मानसिक आरोग्यावर परिणाम संशोधनानुसार, नियमित नूडल्स खाणाऱ्या लोकांमध्ये डिप्रेशन आणि एंग्झायटीचे प्रमाण अधिक असते. कारण यामध्ये असलेले घटक मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम करतात.

5) शरीराला आवश्यक पोषण कमी मिळते नूडल्समध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे आणि मिनरल्सची कमतरता असते. त्यामुळे शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही आणि हाडे कमकुवत होतात.

तर मग पर्याय काय?  जर तुम्हाला इंस्टंट नूडल्स खाण्याची सवय लागली असेल, तर त्याऐवजी गव्हाच्या नूडल्स, भरपूर भाज्या घालून बनवलेले हेल्दी पर्याय निवडा. संतुलित आहार आणि पोषणयुक्त पदार्थांचा समावेश करून आरोग्य जपा.