होळी हा रंगांचा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात

Holi 2025: होळीचा चेहऱ्यावरचा रंग कसा काढावा? पक्का रंग साफ करण्याचे उपाय

होळी हा रंगांचा सण संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, होळी खेळताना लावलेले पक्के रंग त्वचेला हानी पोहोचवू शकतात. त्यामुळे हे रंग त्वचेला त्रास न देता कसे काढावे, हे जाणून घेणे गरजेचे आहे.रासायनिक साबण किंवा स्क्रब वापरण्याऐवजी नैसर्गिक उपायांचा अवलंब करावा.

 नैसर्गिक उपाय वापरा

1. बेसन आणि दही: एक चमचा बेसन आणि दोन चमचे दही एकत्र करून त्वचेवर लावा. काही वेळ ठेवल्यानंतर हलक्या हाताने चोळून काढा. मध आणि लिंबू रस: दोन चमचे मधात एक चमचा लिंबाचा रस मिसळून लावा. यामुळे त्वचेवर मृदुता राहील आणि रंग सहज निघेल.

2. तेल लावण्याचे महत्त्व होळी खेळण्याआधी त्वचेवर खोबरेल किंवा बदाम तेल लावल्यास रंग पटकन निघतो. होळी झाल्यावर देखील कापसाच्या मदतीने तेल लावून हलक्या हाताने रंग काढू शकता.

3. साबणाचा जास्त वापर टाळा अनेक लोक रंग काढण्यासाठी वारंवार साबण वापरतात. मात्र, यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलसरपणा कमी होतो. त्याऐवजी दूध आणि कापसाचा वापर करून रंग हलक्या हाताने पुसून टाका.

हेही वाचा: खोक्याच्या अटकेवर धसांची प्रतिक्रिया

4. कोरड्या त्वचेसाठी उपाय ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी गुलाबपाणी आणि गlycerin चा वापर करावा. यामुळे त्वचा मऊ राहील आणि रंग सहज निघेल.

5. केसांमधील रंग कसा काढावा? केसांमध्ये तेल लावणे आवश्यक: होळी खेळण्यापूर्वी केसांना तेल लावल्यास रंग पटकन निघतो. हर्बल शॅम्पू वापरा: रासायनिक शॅम्पूऐवजी हर्बल शॅम्पू किंवा आंबट ताकाने केस धुवावेत. कोरफडीचा रस: केसांना कोरफडीचा रस लावल्याने रंग लवकर निघतो आणि केस चमकदार राहतात.

होळीचा रंग काढताना त्वचेला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. नैसर्गिक उपाय आणि योग्य काळजी घेतल्यास त्वचेचे आरोग्य राखले जाऊ शकते.