लोहयुक्त बीट 'या' लोकांसाठी ठरू शकते विष; कोणत्या लोकांनी त्याचे सेवन टाळावे? जाणून घ्या
Beetroot: बीट आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. त्यात जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. शरीरात अशक्तपणा असल्यास डॉक्टर तुम्हाला तुमच्या आहारात बीटचा समावेश करण्यासं सांगतात. परंतु, एवढे सगळे गुण असूनही, हे सुपरफूड काही लोकांसाठी हानिकारक ठरू शकते. त्याचे सेवन कोणत्या लोकांसाठी हानिकारक असू शकते? कोणत्या लोकांनी त्याचे सेवन टाळावे? ते जाणून घेऊयात....
बीटचे सेवन कोणी करू नये?
कमी रक्तदाब असलेल्यांनी बीटचे सेवन टाळावे -
बीटमध्ये नायट्रेट्स असल्याने बीटचा रस पिल्याने उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. नायट्रेट्स नायट्रिक ऑक्साईडचे उत्पादन वाढवतात. पण जर तुम्हाला कमी रक्तदाबाची समस्या असेल तर चुकूनही ते खाऊ नका. कमी रक्तदाब (हायपोटेन्शन) असलेल्या व्यक्तींनी बीटचे सेवन सावधगिरीने करावे.
हेही वाचा - डोळ्यांच्या आरोग्यासाठी पालक फायदेशीर
मधुमेही रुग्ण -
बीटमध्ये भरपूर फायबर असतात. त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो, तरीही जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्यातील साखरेचे प्रमाण रक्तातील साखरेच्या पातळीवर परिणाम करू शकते. म्हणून, मधुमेही रुग्णांनी किंवा रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करणाऱ्या लोकांनी बीटरूटचे सेवन टाळावे.
लोहाचे प्रमाण जास्त -
बीट हे लोहाचा एक उत्कृष्ट स्रोत आहे, जे सामान्यतः लोहाच्या कमतरतेमुळे ग्रस्त असलेल्या लोकांसाठी फायदेशीर आहे. तथापि, हेमोक्रोमॅटोसिस सारख्या आजार असलेल्या लोकांनी बीटरूटचे जास्त सेवन करणे टाळावे.
हेही वाचा - किडनी खराब झाल्यानंतर शरीर देते 'हे' संकेत
किडनी स्टोन -
बीट हे फोलेट आणि मॅंगनीज सारख्या पोषक तत्वांचा उत्कृष्ट स्रोत आहे. त्यात ऑक्सलेट देखील मोठ्या प्रमाणात आढळते, जे किडनी स्टोनसाठी जबाबदार असू शकते. विशेषतः, जर तुम्हाला किडनी स्टोनच्या समस्येचा त्रास होत असेल तर तुम्ही चुकूनही बीट खाऊ नका.
अॅलर्जी असलेले रुग्ण -
बीटमुळे अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे पुरळ उठणे, खाज सुटणे किंवा श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी लक्षणे दिसू शकतात. बीट खाल्ल्यानंतर ज्या कोणालाही ऍलर्जीचा अनुभव येतो त्यांनी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.