Rose Water : चमकदार आणि सुंदर त्वचेसाठी गुलाब पाणी फायदेशीर जाणून घ्या..
मुंबई : गुलाबाचे फूल सगळ्यांनाच आवडते. गुलाब फुलांचा राजा मानला जातो. गुलाबाच्या फूलाचे अनेक रंग आहेत. काही गुलाब सुगंधासाठी आवडतो. तर काहींना केसात माळण्यासाठी आवडतो. तर काही जण आपल्या प्रियजनांना देण्यासाठी गुलाबाचा वापर करतात. मात्र गुलाबापासून गुलाब पाणी बनवले जाते. ते चेहऱ्यासाठी चांगले मानले जाते. गुलाबपाणी हा एक नैसर्गिक घटक आहे. जो त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो.
चेहऱ्याला गुलाब पाणी लावण्याचे फायदे
त्वचा ताजीतवानी ठेवते गुलाबपाण्यातील थंडावा त्वचेला ताजेतवाने आणि फ्रेश ठेवतो.
नैसर्गिक टोनर म्हणून काम करते त्वचेच्या छिद्रांना घट्ट करून टोनिंग करण्यासाठी गुलाबपाणी अत्यंत उपयुक्त आहे.
मुरुम आणि डाग कमी करतो गुलाबपाणीमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे मुरुम कमी करण्यात मदत करतात.
चेहऱ्याचा तेलकटपणा कमी करतो स्निग्ध (ऑईली) त्वचा असणाऱ्यांसाठी गुलाबपाणी फायदेशीर आहे, कारण ते त्वचेवरील जास्तीचे तेल कमी करते.
हेही वाचा : दरररोज केसांना लिंबू लावताय? मग ही बातमी वाचाच
डोळ्यांखालील काळी वर्तुळे कमी करतो कापसाच्या बोळ्याने थंड गुलाबपाणी डोळ्यांखाली लावल्यास काळी वर्तुळे आणि सूज कमी होते.
सुरकुत्या आणि त्वचेवरील वृद्धत्वाची लक्षणे कमी करतो गुलाबपाणीमध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेवरील सुरकुत्या आणि वृद्धत्वाच्या खुणा कमी करतात.
उन्हामुळे होणारे नुकसान कमी करतो गुलाबपाणी त्वचेला थंडावा देऊन सनबर्न आणि उन्हामुळे होणाऱ्या जळजळीपासून संरक्षण देते.
त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराईज करते कोरड्या त्वचेसाठी गुलाबपाणी खूप उपयुक्त आहे, कारण ते त्वचेला ओलावा देते.
नैसर्गिक मेकअप रिमूव्हर म्हणून वापर करता येतो गुलाबपाणी आणि नारळाचे तेल एकत्र करून मेकअप सहजपणे काढता येतो.
तणाव कमी करणारे आणि मन शांत करणारे गुलाबपाण्याचा सुगंध मन शांत करून तणाव दूर करण्यात मदत करतो.
कसा वापरावा? रोज सकाळी आणि रात्री कापसाच्या साहाय्याने चेहऱ्यावर गुलाबपाणी लावा. फेस पॅक आणि स्क्रबमध्ये गुलाबपाणी मिसळून वापरा. गुलाबपाणी स्प्रे बाटलीत भरून दिवसातून 2-3 वेळा चेहऱ्यावर मारल्यास त्वचा ताजीतवानी राहते. गुलाबपाणी नैसर्गिक असल्याने त्वचेचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही.
Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.