पोळी जाड खावी की पातळ? आरोग्यासाठी कोणती जास्त चांगली?
Thin Roti Vs Thick Roti : पोळी हा आपल्या आहारातील एक अविभाज्य भाग आहे. जेवणात सगळेच जण पोळी खातात. वेगवेगळ्या घरांमध्ये पोळी बनवण्याच्या पद्धतीत थोडा-फार फरक असतो. शिवाय, काही लोक गव्हाच्या पिठाच्या पोळ्या खातात, तर काही मल्टीग्रेन पिठाच्या (विविध धान्यांचे एकत्र पीठ). त्यात भरपूर फायबर तसेच, अनेक प्रकारची पोषक तत्त्वे असतात, जी शरीरासाठी आवश्यक असतात.
जाड पोळी की पातळ पोळी, कोणती जास्त आरोग्यदायी? खरं तर, जाड किंवा पातळ कोणतीही पोळी तुम्ही खाऊ शकता. दोन्हीही आरोग्यदायी असतात. मात्र, त्यात थोडासा फरक असतो. शिवाय, पीठ कोणत्या धान्यांचे आहे, यावरूनही कोणती पोळी अधिक आरोग्यदायी ते ठरवता येईल. पोळी बनवण्याच्या पद्धतीमुळेही त्याचे फायदे कमी-जास्त होतात.
हेही वाचा - दुधाचा चहा पिणे चांगले की वाईट? महिनाभर नाही घेतला तर काय होईल?
तर, प्रत्येक ठिकाणची पोळी बनवण्याची पद्धत वेगळी असते. काही ठिकाणी पातळ पोळी खातात; तर, काहींना जाड पोळी आवडते. मात्र, पातळ पोळी थोडी मऊ असते आणि ती खाताना जास्त चावावी लागत नाही. दुसरीकडे, जाड पोळी बनवून ठेवली, तर, थोड्या वेळाने ती चावायला थोडी कठीण होते. कारण ती चिवट होऊ शकते. ही बाब भाजण्याच्या पद्धतीवर अवलंबून असते. चला तर मग जाणून घेऊया, कोणती पोळी आरोग्यासाठी चांगली? जाड की पातळ?
पातळ पोळी लवकर पचते : ती खायला हलकी आणि मऊ असते. जर गव्हाच्या पिठाची पोळी पातळ असेल, तर ती फायबर तसेच इतर अनेक पोषक तत्वांनी भरपूर असेल. पातळ पोळी लवकर भाजते : ती कमी तूप किंवा तेल वापरून व्यवस्थित भाजता येते, त्यामुळे तिची पोषक तत्वे टिकून राहतात. अनेक लोक जाड पोळी किंवा पराठा भाजण्यासाठी तूप किंवा तेल लावतात. ती आतमध्ये कच्ची राहू नये, यासाठी जास्त वेळ भाजावी लागते, त्यामुळे पिठातील पोषक तत्वे नष्ट होतात. जर तुम्ही ती भरपूर तेल आणि तूप लावून खाल्ली, तर कॅलरीज वाढतात, ज्यामुळे वजन वाढू शकते. पचनासाठी हलकी : जर तुम्हाला सहज पचणारी पोळी हवी असेल, तर गव्हाच्या पिठाची पातळ पोळी जास्त आरोग्यदायी, हलकी आणि सहज पचणारी असते. पातळ पोळी हलकी असते. जाड पोळी कच्ची राहू नये म्हणून ती जास्त वेळ आगीवर भाजतात, यामुळे फायबर आणि इतर पोषक तत्वे कमी होतात. शिवाय, ती पचायला जड जाते. पातळ पोळीत जास्त फायबर : जाड पोळीच्या तुलनेत पातळ पोळीत जास्त फायबर असते. कारण ती भाजायला जास्त वेळ घेत नाही. अशा स्थितीत गहू किंवा इतर धान्यांपासून बनवलेल्या पोळ्यांमध्ये सर्व पोषक तत्वे टिकून राहतात. मध्यम आचेवर भाजलेली पोळी उत्तम : जी पोळी तुम्ही मध्यम आचेवर भाजू शकता आणि जी खायला मऊ असते ती सर्वात आरोग्यदायी असते. तर, पातळ पोळी मध्यम आचेवरही कमी वेळात व्यवस्थित शिजते.
हेही वाचा - ओव्याची पाने आरोग्यासाठी अमृत! उन्हाळ्यात हे 3 आजार तुमच्या जवळही येणार नाहीत..
एकंदरीत, जर गव्हाच्या कोंडायुक्त पिठापासून पोळी बनवलेली असेल, तर तुम्ही जाड खा किंवा पातळ, ती तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीरच असेल. त्यातही पातळ पोळी ही जाड पोळीपेक्षा आरोग्यदृष्ट्या अधिक फायदेशीर मानली जाते. ती लवकर पचते, भाजायला कमी वेळ लागतो आणि त्यामुळे तिच्यातील फायबर आणि पोषकतत्त्व टिकून राहतात.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)