Superfoods for Skin: महागड्या स्किन केअर शिवाय चमकदार त्वचा मिळवण्याचा सोपा मार्ग; जाणून घ्या
Superfoods for Skin: सौंदर्य टिकवण्यासाठी बहुतेक लोक महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्स आणि ट्रीटमेंट्सवर पैसा खर्च करतात. पण खरे सौंदर्याचे रहस्य फक्त बाहेरच्या उपचारात नसून, तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमध्ये दडलेले आहे. योग्य आहार घेऊन तुम्ही त्वचेची नैसर्गिक चमक वाढवू शकता आणि लवकर वृद्धत्वाची लक्षणे जसे की सुरकुत्या आणि फाइन लाईन्स यांचाही सामना सहज करू शकता.
बदाम आणि अक्रोड: बदाम आणि अक्रोड हे ड्राय फ्रूट्स त्वचेसाठी नैसर्गिक टॉनिक म्हणून काम करतात. त्यात असलेले ओमेगा-3 फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन E त्वचेला आतून सॉफ्टनेस देतात, ड्रायनेस कमी करतात आणि त्वचा तजेलदार ठेवतात. दररोज एक मूठ ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने त्वचा टाइट आणि यंग दिसते.
टोमॅटो: टोमॅटो हा देखील त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. सलाड किंवा भाजीत टोमॅटो घालल्यास त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो आणि सुरकुत्या कमी होतात.
दही: दही मध्ये असलेले प्रोबायोटिक्स त्वचेसाठी फायदेशीर आहेत. ते पचन सुधारतात तसेच त्वचेला हेल्दी आणि साफ ठेवतात. नियमित दही खाल्ल्याने त्वचा नैसर्गिकपणे चमकदार होते आणि वृद्धत्वाचा प्रभाव मंद होतो. हेही वाचा: Lemon In Fridge Benefits: कापलेले लिंबू फ्रिजमध्ये ठेवण्याचे आहेत अनेक फायदे; जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
गाजर: गाजरामध्ये बीटा-कॅरोटिन आणि व्हिटॅमिन A मुबलक प्रमाणात असतात, जे त्वचेला हेल्दी ठेवतात आणि एजिंग प्रक्रिया मंद करतात. गाजर खाल्ल्याने त्वचा मऊ आणि चमकदार राहते, विशेषत: हिवाळ्यात हा नैसर्गिक स्किन फूड अत्यंत उपयुक्त आहे.
दूध: हळद टाकलेले दूध ही भारतीय घरांतील पारंपरिक पेय आहे, ज्यामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटी-एजिंग गुणधर्म आहेत. रात्री झोपण्यापूर्वी हल्दी दूध प्याल्याने सुरकुत्या कमी होतात, त्वचा आतून हेल्दी आणि चमकदार बनते.
हिरव्या पालेभाज्या: हिरव्या पालेभाज्या जसे की पालक, मेथी, दुधी या त्वचेसाठी नैसर्गिक डिटॉक्ससारखे काम करतात. यात असलेले व्हिटॅमिन C आणि लोह रक्ताभिसरण सुधारतात, ज्यामुळे त्वचा तजेलदार आणि फ्रेश राहते. हेही वाचा: Mint Water Benefits: त्वचा आणि शरीरासाठी सुपरड्रिंक; जाणून घ्या पुदिनाच्या पाण्याचे 'हे' 7 अद्भुत फायदे
तुमची त्वचा चमकदार ठेवण्यासाठी महागड्या प्रोडक्ट्सची आवश्यकता नाही. फक्त तुमच्या रोजच्या आहारात हेल्दी आणि पोषक अन्न यांचा समावेश करा. उदाहरणार्थ, बदाम, टोमॅटो, गाजर, दही, दूध आणि हिर्या पालेभाज्या खाल्ल्याने त्वचा नैसर्गिकपणे चमकदार होते आणि सुरकुत्या, वृद्धत्वाचे लक्षणे कमी होतात.
सुंदर त्वचा मिळवण्यासाठी आहारात बदल करणे हा सर्वात सोपा आणि नैसर्गिक मार्ग आहे. महागडे क्रीम्स आणि ट्रीटमेंट्स ऐवजी हे सुपरफूड्स तुमच्या त्वचेला अंतःकरणापासून निरोगी ठेवतात, सौंदर्य नैसर्गिकपणे वाढवतात आणि त्वचा यंग दिसायला मदत करतात. (Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)