Peanut Butter Benefits: वर्कआउट करणाऱ्यांसाठी पीनट बटर का आहे बेस्ट? जाणून घ्या फायदे
Peanut Butter Benefits: पीनट बटर म्हणजे चव आणि पोषणाचा परिपूर्ण संगम. शेंगदाण्यापासून तयार होणारे हे हेल्दी स्प्रेड आजकाल फिटनेस लव्हर्सपासून ते कामकाजी लोकांपर्यंत सर्वांच्याच आवडीचे झाले आहे. त्याची क्रीमी टेक्स्चर आणि नट्सची स्वादिष्ट चव यामुळे ते ब्रेड, रोटी, ओट्स किंवा स्मूदीसोबत सहज खाल्ले जाते. पण पीनट बटर केवळ चविष्टच नाही, तर आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे. विशेषतः वजन कमी करणे (Weight Loss) आणि स्नायू वाढवणे (Muscle Gain) या दोन्ही गोष्टींसाठी ते उपयोगी ठरते.
मसल्स गेनसाठी पीनट बटर
स्नायू मजबूत करण्यासाठी प्रोटीन आवश्यक असते आणि पीनट बटर हा प्रोटीनचा उत्तम स्रोत आहे. फक्त दोन चमच्यात साधारण आठ ग्रॅम प्रोटीन मिळते, जे मसल्सच्या वाढीस आणि रिपेअरला मदत करते. त्यामुळे जिम करणारे लोक पीनट बटर ब्रेडवर, स्मूदीमध्ये किंवा शेकसोबत घेतल्यास त्यांना प्री-वर्कआउट किंवा पोस्ट-वर्कआउटमध्ये आवश्यक पोषण मिळते.
वजन कमी करण्यासाठी पीनट बटर
बर्याच लोकांना वाटते की पीनट बटरमध्ये फॅट असल्याने वजन वाढते. पण प्रत्यक्षात त्यातले हेल्दी फॅट्स भूक आटोक्यात ठेवतात. पीनट बटर खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेले वाटते, त्यामुळे जास्त खाणे टळते. यामुळे अनावश्यक स्नॅक्सची सवय कमी होते आणि वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते. तसेच पीनट बटर मेटाबॉलिझम वाढवून फॅट बर्निंगला सहाय्य करते.
पीनट बटरचे इतर फायदे
ऊर्जेचा स्त्रोत: पीनट बटरमध्ये कार्बोहायड्रेट्स आणि हेल्दी फॅट्स असल्यामुळे लगेच एनर्जी मिळते. सकाळी नाश्त्यात याचा समावेश केल्यास दिवसभर जोमाने काम करता येते.
हृदयाचे आरोग्य सुधारते: यामध्ये असलेले अनसॅच्युरेटेड फॅट्स शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल कमी करून चांगले कोलेस्टेरॉल वाढवतात. त्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.
त्वचा व केसांसाठी उपयुक्त: पीनट बटरमध्ये व्हिटामिन E, मॅग्नेशियम आणि पोटॅशियमसारखे पोषक तत्त्व असतात जे त्वचेची चमक वाढवतात, केस मजबूत करतात आणि रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.
इम्युनिटी बूस्टर: पीनट बटरमधील अँटीऑक्सिडंट्स शरीरातील फ्री-रॅडिकल्स कमी करून प्रतिकारशक्ती वाढवतात. यामुळे स्किन हेल्दी राहते आणि वय वाढल्याची चिन्हे उशिरा दिसतात.
योग्य प्रमाण किती?
पीनट बटर फायदेशीर असले तरी त्याचे प्रमाण नियंत्रित ठेवणे महत्त्वाचे आहे. दररोज 1 ते 2 चमचे पीनट बटर पुरेसे आहे. नैसर्गिक आणि साखर नसलेले व्हेरिएंट निवडल्यास ते अधिक आरोग्यदायी ठरते.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)