प्रत्येक स्त्रिसाठी आई होणं ही गोष्ट भावनिक असते.

गरोदरपणात स्वतःची काळजी कशी घ्यावी? पाहाच

प्रत्येक स्त्रिसाठी आई होणं ही गोष्ट भावनिक असते. जेव्हा तुम्हाला बाळाची चाहूल लागते, तेव्हा ते क्षण प्रत्येक स्त्रिसाठी खूप खास असते. स्त्रिला असं जाणवतं की आपण एकटे नसून एक गोंडस जीव आपल्यासोबत आहे. अशातच, काही महिला पहिल्यांदाच गरोदरपणाचा अनुभव घेत असतात. त्यामुळे गरोदर स्त्रियांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. या नऊ महिन्यांमध्ये काय करावे? काय नाही करावे? प्रत्येकाच्या वयानुसार, किंवा शारीरिक क्षमतेनुसार वेगवेगळे असू शकते. त्यामुळे गर्भधारणा झाल्यापासून ते बाळाच्या जन्मापर्यंत कशाप्रकारे स्वतःची घ्यावी हे आपण जाणून घेणार आहोत. 

हेही वाचा: Increase In Blood Sugar At Night: रात्री चुकूनही खाऊ नका कँडी, चॉकलेट आणि पॉपकॉर्न; नाहीतर, ब्लड शुगर वेगाने होईल स्पाईक

1 - संतुलित आहार करा:

गरोदरपणात, स्त्रियांना संतुलित आहार घेण्याची गरज जास्त असते. अशातच, संतुलित आहार घेतल्यामुळे गरोदरपणात तुम्हाला आणि तुमच्या बाळाला मोठ्या प्रमाणात प्रोटीन, कार्बोहायड्रेट, जीवनसत्वे मिळतात. हिरव्या पालेभाज्या, फळे, धान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. दररोज संतुलित आहार केल्यामुळे, शरीरात ऊर्जेचा प्रवाह निर्माण होतो. 

2 - नियमित व्यायाम करा:

नियमित व्यायाम केल्यामुळे शरीरातील रक्तप्रवाह सुधारते, स्नायूंना बळकटी येते आणि त्यासोबतच हार्मोन्सचे संतुलन राखण्यासदेखील मोठ्या प्रमाणात मदत होते. गरोदरपणात, जास्त प्रमाणात हालचाल करणे टाळावे. सोबतच, जास्त मेहनती खेळ खेळू नये. स्कुबा डायव्हिंगमुळे गर्भात जन्मदोष निर्माण होऊ शकतो, त्यामुळे स्कुबा डायव्हिंग करू नये. 

3 - ताणतणाव घेणे टाळावे:

गरोदरपणात ताणतणाव घेतल्यामुळे स्वतःसोबतच, बाळाच्या आरोग्यावरदेखील मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. ताणतणाव घेतल्यामुळे स्वतःसोबत बाळाच्या आरोग्यावरदेखील नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे शक्य असेल तर स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यामुळे, बाळाचे आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. 

4 - घातक पदार्थांचे सेवन करणे टाळावे:

गरोदरपणात, धूम्रपान, मद्यपान, किंवा मांसाहार पदार्थ्यांचे सेवन केल्यामुळे बाळाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे घातक पदार्थांचे सेवन करणे टाळावे. 

5 - प्रवास करणे टाळावे: 

गर्भावस्थेत प्रवास करणे प्रत्येक स्त्रिसाठी अवघड गोष्ट ठरू शकते. जर काही करणानिमित्त तुम्हाला प्रवास करणे गरजेचे असेल तर, अशा ठिकाणी प्रवास करा, ज्या ठिकाणी आरोग्य सेवा सहजपणे उपलब्ध असतील. आपले गर्भधारणेचे अहवाल नेहमी सोबत ठेवा. गर्भावस्थेत ट्रेन किंवा बसमधून प्रवास करत असाल तर शक्यतो उभे राहू नका. शक्यतो लांबचा प्रवास टाळावा.

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)