तरूणी त्वचेची काळजी घेत असतात.

त्वचा चमकदार आणि सुंदर ठेवण्यासाठीचे उपाय

मुंबई : सगळ्यांनाच स्वत:ची त्वचा चमदार आणि सुंदर असावी असे वाटत असते. त्यामुळे तरूणी त्वचेची काळजी घेत असतात. तरुणी स्वत:ची त्वचा तेजस्वी दिसावी यासाठी महागडे फेसवॉश आणि क्रिम लावताना दिसून येतात. अशातच घरगुती उपाय करून त्वचा चमकदार करण्यासाठीचे उपाय जाणून घ्या.

1 नारळ पाणी प्या.

दररोज नारळ पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते. पर्यायाने त्वचा हायड्रेट ठेवण्यासाठी मदत होते. त्वचेला हायड्रेट ठेवण्यात नारळ पाणी हे जादूगर आहे.

 

2. काकडी खा.

काकडी खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. दररोज ताजी काकडी खालल्याने त्वचा ताजी आणि मुलायम राहते.

 

3. हळद- लिंबू पॅक लावा.

हळद आणि लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. चमकदार त्वचा करण्यासाठी हा घरबुती रामबाण उपाय आहे.

 

4. भरपूर झोप घ्या.

आठ ते नऊ तासांची गाढ झोप तुम्हाला तरूण आणि ताजेतवाने ठेवेल.

 

5. मेडिटेशन करा

दररोज फक्त 5 मिनिटे ध्यान करा. ध्यान केल्याने तणाव कमी होऊन तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो.

 

6. बटाट्याचा रस लावा.

बटाट्याचा रस चेहऱ्यावर लावा. बटाट्याचा रस चेहऱ्यावरील डाग आणि टॅनिंग कमी करण्यास मदत करते.

 

7. भरपूर पाणी प्या.

दिवसभरात तीन ते चार लिटर पाणी प्यावे. भरपूर पाणी प्यायल्याने त्वचा निरोगी आणि चमकदार राहते.