साखर अचानक सोडल्याने थकवा, मूड स्विंग, झोपेचे त्रा

Sugar Withdrawal: साखर खाणं बंद करणार आहात? थांबा! हे 5 गंभीर दुष्परिणाम आधी वाचा…नाहीतर पश्चात्ताप होईल

Sugar Withdrawal: साखर किंवा साखरयुक्त पदार्थ हा आपल्या दैनंदिन आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र, आरोग्य जागृती आणि फिटनेसच्या ध्यासामुळे सध्या अनेकजण साखर पूर्णपणे वर्ज्य करण्याचा निर्णय घेत आहेत. मधुमेह, लठ्ठपणा किंवा वजन वाढ यांसारख्या समस्यांमुळे साखर थांबवणे योग्य वाटते, मात्र आरोग्य तज्ज्ञांच्या मते अचानक साखर सोडण्याचे शरीरावर काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात.

अचानक साखर खाणे सोडल्याने होणारे 5 मोठे दुष्परिणाम:

थकवा आणि अशक्तपणा: साखरेमुळे शरीराला ऊर्जा मिळते. साखर बंद करताच शरीरातील ऊर्जेची पातळी कमी होते आणि थकवा व अशक्तपणा जाणवतो.

मूड स्विंग आणि चिडचिडेपणा: साखर मेंदूमध्ये डोपामिन हार्मोन तयार करण्यास मदत करते. त्यामुळे अचानक साखर बंद केल्यास मूडमध्ये वारंवार बदल होतो, चिडचिडेपणा आणि नैराश्य जाणवते.

डोकेदुखी आणि ब्रेन फॉग: साखर थांबवताना अनेकांना डोकेदुखी, चक्कर येणे, विचारांमध्ये गुंतागुंत यांसारखे ब्रेन फॉगचे त्रास होतात. हेही वाचा:Fruits to avoid during monsoon: पावसाळ्यात 'ही' 5 फळ खाणं आहे धोकादायक; जाणून घ्या

झोपेवर परिणाम: साखर शरीरातील स्लीप हार्मोनवर परिणाम करते. त्यामुळे साखर बंद केल्याने झोपेच्या सवयींमध्ये बदल होतो आणि झोपेत अडथळे येतात.

गोड खाण्याची तीव्र इच्छा: साखर बंद करताच गोड खाण्याची तीव्र इच्छा वाढते आणि बरेचदा लोक जंक फूडकडे वळतात, जे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

साखर किती खाणे योग्य? जागतिक आरोग्य संघटनेनुसार, दररोजच्या कॅलरीपैकी फक्त 5% साखर घ्यावी म्हणजेच सुमारे 25 ग्रॅम किंवा 6 चमचे.

हाय शुगरची लक्षणे: वारंवार लघवी होणे, तहान लागणे, थकवा, अस्पष्ट दृष्टी, डोकेदुखी, चिडचिड, भूक वाढणे पण वजन न वाढणे, जखमा उशीराने भरणे अशी लक्षणे असू शकतात.

नेमके काय करावे?

साखर हळूहळू कमी करा

नैसर्गिक साखर असलेले पदार्थ जसे फळं, गूळ, खजूर खा

साखरयुक्त पदार्थ, मिठाई, कोल्डड्रिंक टाळा

गोड खाण्याची इच्छा झाली तर सुकामेवा खा

पौष्टिक आहार आणि व्यायामावर भर द्या

थेट साखर बंद न करता योग्य प्रमाणात व शहाणपणाने वापरणे हेच आरोग्यासाठी हितकारक. (Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)