Lemon In Fridge Benefits: कापलेले लिंबू फ्रिजमध्ये ठेवण्याचे आहेत अनेक फायदे; जाणून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित!
Lemon In Fridge Benefits: लिंबू आपल्या दैनंदिन जीवनात खूप खास मानले जाते. जेवणाची चव तसेच आरोग्यासाठी लिंबूचा उपयोग नेहमीच फायदेशीर ठरतो. पण तुम्हाला माहिती आहे का, की लिंबू फ्रिजमध्ये ठेवण्याचे देखील अनेक फायदे आहेत? जर तुम्ही कापलेला लिंबू फ्रिजमध्ये ठेवला, तर तो फक्त आरोग्यासाठीच नव्हे तर तुमच्या फ्रिजसाठीही फायदेशीर ठरतो.
फ्रिजमधील वास दूर करतो
फ्रिजमध्ये अनेकदा अन्नपदार्थ ठेवताना दुर्गंधी निर्माण होते. अशावेळी कापलेला लिंबू ठेवणे हा सोपा उपाय आहे. लिंबूमध्ये असणारे सायट्रिक अॅसिड वास कमी करण्यात मदत करते आणि फ्रिजला नेहमी ताजेतवाने ठेवते.
लिंबू फ्रिज स्वच्छ व बॅक्टेरिया-फ्री ठेवतो
लिंबूमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म असतात. त्यामुळे तो फ्रिजमध्ये ठेवला असता बॅक्टेरियाची वाढ कमी होते आणि फ्रिज स्वच्छ व सुरक्षित राहतो.
हेही वाचा - Mint Water Benefits: त्वचा आणि शरीरासाठी सुपरड्रिंक; जाणून घ्या पुदिनाच्या पाण्याचे 'हे' 7 अद्भुत फायदे
अन्न खराब होण्यापासून वाचवतो
फ्रिजमध्ये ठेवलेले अन्न पटकन खराब होऊ नये असे वाटत असेल, तर लिंबू हा सर्वोत्तम उपाय आहे. त्यातील अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म अन्न ताजे ठेवतात व ते लवकर कुजण्यापासून रोखतात.
कापलेला लिंबू फ्रिजमधून कधी फेकून द्यावा ?
लिंबू फ्रिजमध्ये तोपर्यंत ठेवावा, जोपर्यंत त्याचा रंग हिरवा राहतो. एकदा तो पिवळा किंवा सुकायला लागला, की लगेच फेकून द्यावा आणि नवीन लिंबू फ्रिजमध्ये ठेवावा. अशा प्रकारे, कापलेला लिंबू हा फक्त स्वयंपाकातच नाही तर तुमच्या फ्रिजसाठीही नैसर्गिक फ्रेशनर व क्लीनर म्हणून काम करतो.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)