आचार्य चाणक्य यांची शिकवण प्रत्येकासाठी मार्गदर्शक

Chanakya Niti : हे 4 लोक घरात असतील तर जीवन बनेल मृत्यूची मगरमिठी! चाणक्य म्हणतात, तिथे मुळीच थांबू नका

Chanakya Niti: भारताच्या इतिहासात चाणक्य नीती हा एक महान तात्विक ग्रंथ मानला जातो. यामध्ये आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित समाज, राजकारण, देश, परराष्ट्र धोरण याबद्दल तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे. 

आचार्य चाणक्य यांना कौटिल्य किंवा विष्णुगुप्त म्हणूनही ओळखले जाते. त्यांचा जन्म सुमारे 3 हजार वर्षांपूर्वी झाला होता. ते प्राचीन भारताचे एक महान तत्वज्ञानी, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि रणनीतीकार होते. ते मौर्य साम्राज्याचे संस्थापक चंद्रगुप्त मौर्य यांचे गुरु आणि सल्लागार होते. त्यांनी त्यांच्या अनुभवांवर आधारित अर्थशास्त्र नावाचे पुस्तक लिहिले. हे त्यांचे सर्वात प्रसिद्ध काम अर्थशास्त्र आहे, जे राजकारण, अर्थशास्त्र, शासन आणि युद्ध धोरण यावर एक विस्तृत ग्रंथ आहे. यातील त्यांचे लेखन शेकडो वर्षांनंतरही आजही प्रासंगिक वाटते. या पुस्तकात चाणक्य यांनी घरात राहणाऱ्या अशा 4 लोकांपासून सावध राहण्यास सांगितले आहे, ज्यांच्यापासून जर वेळेत अंतर राखले नाही तर, जीवन नरकासारखे बनते किंवा मृत्यूच्या मगरमिठीत पडल्यासारखी स्थिती होते. चला, जाणून घेऊया, ते 4 लोक कोण आहेत.

हेही वाचा - Chanakya Niti : चुकूनही या 3 गोष्टींची लाज बाळगू नये; अन्यथा, होते नुकसान

या महिला जीवन नरक बनवतात आचार्य चाणक्य म्हणतात की, ज्या घरात वाईट स्त्रिया असतात, त्या घरच्या पुरुषाचे किंवा स्वामीचे आयुष्य मृत माणसासारखे होते. त्याच्या स्वतःच्या घरात त्याचे काहीही चालत नाही. त्या दुष्ट स्त्रियांच्या कारस्थानांमध्ये तो अडकून पडतो आणि तो हळूहळू कुढत-कुढत मृत्यूकडे वाटचाल करत राहतो.

कोणत्या प्रकारच्या मित्रांवर विश्वास ठेवू नये? चाणक्य नीतिनुसार, जर तुमचा एखादा मित्र वाईट स्वभावाचा असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवता येत नाही. तो कधी तुमचा विश्वासघात करेल हे कळत नाही. म्हणून, अशा मित्रापासून लवकरच दूर जावे. दुष्ट माणसांना मित्र बनवू नये. आज जरी ते तुमच्याशी चांगले वागत असतील, तरी ते किती दिवस टिकेल काही सांगता येत नाही. त्यामुळे मित्र, संगत नेहमी चांगलीच असावी.

अशा कर्मचाऱ्यांना कामावर ठेवू नका आचार्य चाणक्य म्हणतात की तुमच्या हाताखाली काम करणारा कर्मचारी जो तुम्हाला उलट-सुलट उर्मट उत्तरे देतो, मागे वाईट-साईट बोलतो, तुमचा तिरस्कार करतो, तो कधीही तुमचे मोठे नुकसान करू शकतो. अशा कर्मचाऱ्यासोबत राहणे हे नेहमीच अविश्वासाचे घोट पिण्यासारखे असते.

या प्राण्याचे वास्तव्य असलेल्या घरात राहणे धोकादायक आहे चाणक्य इशारा देतात की, जवळपास सतत साप दिसत असतील किंवा त्या ठिकाणी सापांचा मोठ्या प्रमाणात वावर असेल, तर अशा घरात राहणे धोकादायक आहे. साप कधी चावेल आणि कधी जिवाचा बळी जाईल, ते सांगता येत नाही. यावर कोणाचेही नियंत्रण नसते. म्हणून, त्या घरापासून वेळेवर दूर जावे. अन्यथा ते जीवघेणे ठरू शकते.

हेही वाचा - Chanakya Niti : तुमच्या प्रियकर/प्रेयसीचं तुमच्यावर खरंच प्रेम आहे का? फसवणूक करणारी व्यक्ती कशी ओळखाल?

हे लोक सापाइतकेच धोकादायक

चाणक्यांच्या या शिकवणीचा आणखी एक अर्थ असाही आहे की, घरातील वाईट व दुष्ट स्त्रिया, दुष्ट मित्र आणि तिरस्कार करणारा उर्मट कर्मचारी हे सापाइतकेच भयंकर आहेत. ज्याप्रमाणे साप केव्हा दंश करेल ते सांगता  येत नाही, त्याचप्रमाणे हे लोकही कधी दगा-फटका करतील, ते सांगता येत नाही.

(Disclaimer : ही बातमी सामान्य माहितीवर आधारित आहे. जय महाराष्ट्र याला दुजोरा देत नाही.)