डोळ्यांत दिसणारी खालील काही लक्षणं तुमच्या शरीराती

डोळ्यांत दिसणारी 'ही' 5 लक्षणं सांगतात तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी

नवी दिल्ली: चुकीची जीवनशैली, वाढलेला मानसिक तणाव आणि चुकीच्या आहारामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी झपाट्याने वाढू शकते. बर्‍याच वेळा आपण शरीराच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतो. परंतु, त्यामुळे गंभीर आजार वाढीला लागतात. त्यातीलच एक म्हणजे हृदयरोगाचा धोका, जो उच्च कोलेस्ट्रॉलमुळे निर्माण होतो. विशेष म्हणजे, काही लक्षणे आपल्या डोळ्यांमध्येही दिसू शकतात, जी या समस्येचा इशारा देतात. डोळ्यांत दिसणारी खालील काही लक्षणं तुमच्या शरीरातील कोलेस्टेरॉलची पातळी किती वाढली आहे याबद्दल माहिती देतात. कोणती आहेत ही लक्षणं? जाणून घेऊयात. 

डोळ्यांभोवती पिवळसर ठिपके - 

जर तुमच्या डोळ्यांभोवती किंवा पापण्यांवर पिवळसर फुगे किंवा चट्टे दिसू लागले असतील, तर हे लक्षण झँथेलस्माचे असू शकते. ही स्थिती कोलेस्ट्रॉल वाढल्याचे स्पष्ट लक्षण मानली जाते. हे चट्टे सहसा वेदनारहित असतात. 

हेही वाचा - Health Tips: रात्री दही खाणं आरोग्यासाठी घातक? जाणून घ्या साइड इफेक्ट्स आणि तज्ज्ञांचा सल्ला

अंधुक दृष्टी आणि बुबुळाभोवती निळसर वलय 

कोलेस्ट्रॉलची पातळी जास्त असल्यास, अंधुक दृष्टी किंवा दृष्टी कमी होण्याचा अनुभव येतो. याशिवाय, बुबुळाभोवती (cornea) निळसर किंवा पांढरट वलय तयार होतो, ज्याला ‘आर्कस सेनिलिस’ असे म्हणतात. हे वलय अनेकदा वृद्धांमध्ये दिसते. परंतु, तरुणांमध्ये हे लक्षण दिसल्यास ती हाय कोलेस्ट्रॉलची चेतावणी असते.

हेही वाचा - Cancer Risk: फक्त 2 मिनिटं ब्रश करत असाल तर सावध व्हा, होऊ शकतो कॅन्सर

उच्च कोलेस्ट्रॉल किती धोकादायक आहे?

उच्च कोलेस्ट्रॉलमुळे रक्तवाहिन्या संकुचित होतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोक होण्याचा धोका वाढतो. म्हणूनच वेळेवर लिपिड प्रोफाइल चाचणी करून कोलेस्ट्रॉलची पातळी तपासणे गरजेचे असते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपाय - 

संतुलित आहार घ्या (फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, ओमेगा-3 फॅटी अॅसिड्स)

नियमित व्यायाम करा (दररोज किमान 30 मिनिटे चालणे, सायकलिंग, योगासने)

तंबाखू आणि मद्यपान टाळा. 

तणाव कमी करा. 

डोळ्यांमध्ये दिसणारी ही लक्षणे साधी समजून दुर्लक्ष करू नका. ती शरीरातील अंतर्गत समस्यांची चेतावणी असू शकतात. वरील पैकी कोणतीही लक्षणं आढळल्यास वेळेत डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि लिपिड प्रोफाइल चाचणी करून घ्या. 

Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.