कोलेस्ट्रॉल वाढलंय? त्वचेवरील 'या' बदलांकडे द्या वेळीच लक्ष
मुंबई: धावपळीमुळे, बदलत्या जीवनशैलीमुळे किंवा खाण्याच्या वेळांमध्ये झालेल्या बदलांमुळे अनेकांना विविध आजार होतात. यासह, व्यायाम न केल्याने आणि पोषक आहार न खाल्ल्याने कळत न कळत तुम्ही आजारांना आमंत्रण देत आहात. इतकेच नाही तर अनेक आजारांची लक्षणेही दिसू लागतात. अशातच, एक आजार वेगाने वाढत आहे आणि ते म्हणजे कोलेस्ट्रॉल. जर आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले, तर त्याचा परिणाम फक्त हृदयावर किंवा रक्तवाहिन्यांवरच होत नाही, तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही स्पष्टपणे दिसू लागतात. दुर्दैवाने, अनेकजण या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात आणि विविध आजारांना बळी पडतात. म्हणूनच, त्वचेवरील कोणतेही सूक्ष्म बदल योग्य वेळी ओळखणे आणि त्यांचे परीक्षण करणे गरजेचे आहे. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की, शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास कोणती लक्षणे दिसतात?
1 - डोळ्यांजवळ दिसणारे पिवळे डाग
जर तुम्हाला तुमच्या डोळ्यांजवळ लहान पिवळे डाग दिसत असेल तर ही एक गंभीर समस्या असू शकते. या लक्षणाचे नाव आहे झेंथेलास्मा (Xanthelasma). हे विशेषतः जास्त कोलेस्ट्रॉल असलेल्या लोकांमध्ये आढळते.
2 - शरीरावर होणाऱ्या पिवळसर गाठी
जर तुमच्या हाता-पायांवर, गुडघे किंवा डोळ्यांच्या आजूबाजूला पिवळसर गाठी दिसू लागल्या, तर ते उच्च कोलेस्ट्रॉलचे लक्षण असू शकते. त्वचेखाली चरबी साठल्यामुळे या गाठी तयार होतात.
3 - त्वचेचे लवकर होणारे घाव आणि बरे होण्यास विलंब होणे
कोलेस्टेरॉलमुळे रक्तप्रवाह कमी होतो. ज्यामुळे, जखमा हळूहळू बऱ्या होतात. वारंवार खाज सुटणे, सूज येणे किंवा लहान जखमा होणे याकडे दुर्लक्ष करू नये.
'कोलेस्ट्रॉल' पासून स्वत:चे संरक्षण कसे करावे?
जर तुम्हाला तुमच्या त्वचेत असे बदल दिसले तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तुमचे कोलेस्ट्रॉल तपासा. यासह, कोलेस्ट्रॉल कसे कमी करता येईल? चला सविस्तरपणे जाणून घेऊया.
1 - निरोगी आहार: तळलेले आणि तेलकट पदार्थ खाणे टाळा आणि फायबरयुक्त पदार्थ खाण्यास सुरूवात करा.
2 - नियमित व्यायाम: कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी किमान 30 मिनिटे दररोज व्यायाम करा. यामुळे, कोलेस्टेरॉल कमी होण्यास मदत होईल.
3 - धूम्रपान आणि मद्यपान टाळा: या सवयी तुमच्या शरीरात कोलेस्ट्रॉल वाढवतात आणि हृदयरोगांना आमंत्रण देतात.
4 - नियमित रक्त तपासणी करा: तुमच्या कोलेस्टेरॉलची पातळी तपासत राहा, जेणेकरून वेळीच खबरदारी घेता येईल.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)