पश्चिम बंगालमधील रसगुल्ला केवळ देशातच नाही, तर जगभ

Mishti Doi Recipe : बंगालची प्रसिद्ध मिष्टी दोई रेसिपी आता बनवा घरच्या घरी; जाणून घ्या

मुंबई: पश्चिम बंगालमधील रसगुल्ला केवळ देशातच नाही, तर जगभरात प्रसिद्ध आहे. पण तुम्हाला माहित आहे का? ज्याप्रकारे पश्चिम बंगालमधील रसगुल्ला प्रसिद्ध आहे, अगदी त्याचप्रकारे मिष्टी दोईदेखील खूप प्रसिद्ध आहे. मिष्टी दोई ही बंगालची ट्रेडिशनल रेसिपी आहे. विशेष म्हणजे, मिष्टी दोईला मातीच्या भांड्यामध्ये सर्व्ह केले जाते. मिष्टी दोई कशाप्रकारे तुम्ही घरी बनवू शकता? चला तर सविस्तर जाणून घेऊया.

सामग्री:

1 लिटर दूध 1 वाटी साखर 2 टेबलस्पून दही

कृती: मिष्टी दोई बनवण्यासाठी तुम्ही एका भांड्यात दूध उकळायला ठेवा. त्यानंतर दूध आटवून घ्या. दूध आटवल्यानंतर, त्याला थंड होण्यासाठी बाजूला ठेवा. यानंतर, दूधात साखर घाला आणि मिक्स करा. आता आपण या दूधात दोन चमचे दही टाकूया आणि मिक्स करूया. यादरम्यान, दुधात कोणतीही गाठ राहता कामा नये. आता हे मिश्रण आपण मातीच्या भांड्यात काढणार आहोत. त्यानंतर, तुम्ही मातीच्या भांड्यावर अ‍ॅल्युमिनियम फॉईल लावायचं आणि त्याला सेट करण्यासाठी ठेवाचं. आता तुमची मिष्टी दोई तयार आहे. 

हेही वाचा: PM Narendra Modi Birthday Special : राज्यातील 394 लहान शहरांमध्ये 'नमो उद्यान' उभारणार; उपमुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

मिष्टी दोई खाण्याचे 'हे' आहेत फायदे

मिष्टी दोईचे सेवन केल्यने पचन सुधारण्यास मदत होते. 

सोबतच, मिष्टी दोई खाणे आतड्यांच्या आरोग्यासाठी चांगले असते. 

विशेष म्हणजे, मिष्टी दोईमध्ये दही आणि दूध असते. यातून आपल्याला कॅल्शियमसोबतच, इतर पोषक तत्वेही मिळतात, जे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)