लाईफस्टाईल

Red Facepack: चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो हवा? वापरा जादुई रेड फेसपॅक!

1. गुलाब फेसपॅक (Rose Face Pack)

 height=

साहित्य: 5-6गुलाबाच्या ताज्या पाकळ्या 2चमचे दूध 1 चमचा मध 1 चमचा बेसन

कृती: गुलाबाच्या पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार करा. त्यात दूध, मध आणि बेसन मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने धुवा. फायदे: गुलाबाच्या पाकळ्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. गुलाब फेसपॅक त्वचेला हायड्रेट करून नैसर्गिक चमक देतो.

2. स्ट्रॉबेरी फेसपॅक (Strawberry Face Pack)

 height=

साहित्य: 2-3 स्ट्रॉबेरी 1 चमचा दही 1 चमचा मध

कृती: स्ट्रॉबेरी ब्लेंडरमध्ये बारीक करून त्यात दही व मध मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने धुवा.

फायदे: स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेला उजळवतात आणि मुरुमांची समस्या दूर करतात.

3. टोमॅटो फेसपॅक (Tomato Face Pack)

 height=

साहित्य: 1 लहान टोमॅटो 1 चमचा लिंबाचा रस 1 चमचा गव्हाचे पीठ

कृती: टोमॅटोचे पल्प काढा आणि त्यात लिंबाचा रस व गव्हाचे पीठ मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिटे ठेवा. थंड पाण्याने धुवा.

फायदे: टोमॅटोमध्ये लायकोपीन असते, जे टॅनिंग कमी करून त्वचेला स्वच्छ आणि फ्रेश ठेवते.

4. लाल चंदन फेसपॅक (Red Sandalwood Face Pack)

 height=

साहित्य: 1 चमचा लाल चंदन पावडर 2 चमचे गुलाबपाणी 1 चमचा दही

कृती: लाल चंदन पावडर, गुलाबपाणी आणि दही एकत्र मिसळा. चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिटे ठेवा. स्वच्छ पाण्याने धुवा. फायदे: लाल चंदन त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे टॅनिंग दूर करून त्वचेला गुळगुळीत आणि उजळ बनवते.