Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Weight Loss Tips: काही लोक वाढलेल्या वजनामुळे त्रासलेली आहेत. तर काही लोक फिगर मेंटेन करण्याचा प्रयत्न करत आहेत. वजन कमी करण्यासाठी लोक वेगवेगळे उपायही करतात. मात्र त्याचा फरक पडत नाही. आज आम्ही वजन कमी करण्यासाठी घरगुती उपाय सांगणार आहोत. त्यामुळे तुमचे वजन कमी करण्यास नक्की मदत होईल.
दररोज आहारात जिरे, मध आणि लिंबू या पदार्थांचा समावेश केल्याने वजन कमी होईल. तसेच त्याचे मिश्रण करुन प्यायले जास्त फायदा जाणवेल. चला तर मग जाणून घेऊ जिरे, मध आणि लिंबू यांचे कसे तयार करायचे?
वजन कमी करण्यासाठी जिरे, मध आणि लिंबू यांचा वापर करून एक सोपा आणि प्रभावी घरगुती उपाय कसा तयार करायचा ते खालीलप्रमाणे: साहित्य 1 चमचा जिरे 1 चमचा मध लिंबाच्या 4 स्लाईस 1ग्लास गरम पाणी
कृती 1. सर्वप्रथम, पाणी गरम करून घ्या. 2. एका ग्लासमध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मध आणि लिंबाच्या 4 स्लाईस टाका. 3. या मिश्रणात गरम केलेले पाणी ओता.
सेवन करण्याची पद्धत हे मिश्रण रोज सकाळी उपाशी पोटी नियमितपणे प्या. हे पेय घेतल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ किंवा पिऊ नका. हा उपाय सलग 7 दिवस करा, त्यानंतर 2 दिवसांचा ब्रेक घ्या. पुन्हा 7 दिवस हा उपाय सुरू ठेवा आणि पुन्हा 2 दिवसांचा ब्रेक घ्या. अशा प्रकारे एकूण 21 दिवसांसाठी हा उपाय करा.
उच्च रक्तदाब (BP), मधुमेह (शुगर) किंवा हृदयविकार (Heart Attack) असलेल्या व्यक्तींनी हा उपाय सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(Disclaimer : ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)