Bathing After Eating : जेवणानंतर तुम्ही लगेच अंघोळ करता? 'या' चुकीमुळे होऊ शकतो अपचनाचा त्रास; जाणून घ्या
मुंबई: सकाळी नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर अनेकांना आंघोळ करण्याची सवय असते. पण तुम्हाला माहित आहे का? नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर लगेच आंघोळीला जाणे धोकादायक असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. यामगे नेमके कारण काय आहे? अनेकांना हा प्रश्न पडला असेल. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
पोषणतज्ज्ञ लिमा महाजन यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. लिमा महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेवल्यानंतर लगेच आंघोळ केल्याने आपल्या पचनक्रियेवर वाईट परिणाम होतो. अन्न पचवण्यासाठी शरीरातील जास्त रक्त पोटाकडे जातं, पण आंघोळीमुळे हा रक्तप्रवाह त्वचेच्या दिशेने वळतो. त्यामुळे अन्न व्यवस्थित पचत नाही आणि गॅस, पोट फुगणे, जडपणा अशा समस्या होऊ शकतात.
पुढे, लिमा महाजन यांनी माहिती दिली की, गरम पाण्याने आंघोळ केल्याने शरीराचं तापमान वाढतं आणि रक्त त्वचेच्या दिशेने जातं, त्यामुळे पचन मंदावते. तसेच, थंड पाण्याने आंघोळ केल्याने शरीरातील रक्तवाहिन्या मोठे होतात आणि त्वचेकडे रक्तप्रवाह वाढतो. त्यामुळे, पचनक्रियेवर परिणाम होतो.
किती वेळानंतर अंघोळ करावी?
जेवल्यानंतर लगेच आंघोळ करू नये. किमान 20 मिनिटे अंतर ठेवणं आवश्यक आहे. तसेच, 10-15 मिनिटे वज्रासनात बसावे, जेणेकरून नैसर्गिकरित्या पचन सुधारण्यास मदत होते, अशी माहिती लिमा महाजन यांनी दिली.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)