Flight Colour: विमानं प्रामुख्याने पांढऱ्या रंगाचीच का असतात? जाणून घ्या यामागचं खरं कारण
मुंबई: आकाशात विमान उडताना आपण अनेकदा पाहिला असाल. पण विमान उडताना तुम्ही एक गोष्ट पाहिलात का? ते म्हणजे विमान हा बहुतांश पाढऱ्या रंगाचा असतो. काही कंपन्या आकर्षक लोगो, डिझाईन किंवा वेगळेपणा दाखवण्यासाठी इतर रंगाचा वापर करतात. मात्र, तरीही जगभरात 90% विमाने पांढऱ्या रंगानेच रंगवली जातात. मात्र, अनेकदा तुम्हाला हा प्रश्न पडला असेल आणि ते म्हणजे, विमानाला पांढऱ्या रंगानेच का रंगवली जातात? यामागे अनेक वैज्ञानिक, आर्थिक आणि तांत्रिक कारणे दडली आहेत. चला तर सविस्तर जाणून घेऊया.
उष्णतेपासून वचाव करण्यासाठी: पांढरा रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतो. त्यामुळे, बाहेरील तापामानाच्या तुलनेने विमान थंड राहते. आकाशात हजारो फूट उंच उडताना विमानाला प्रचंड उष्णता सहन करावी लागते. तसेच, काळ्या किंवा गडद रंगांच्या तुलनेत पांढरा रंग विमानाच्या पृष्ठभागाला थंड ठेवतो. जर गडद रंग वापरलं, तर तो रंग उष्णता शोषून घेतो. परिणामी, विमाना बाहेरील भाग जास्त गरम होण्याची शक्यता असते आणि इंधनाचा खर्चही वाढू शकतो. त्यामुळे, उष्णतेपासून संरक्षण करण्यासाठी आणि विमानाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे.
सुरक्षा कारणात्सव: पांढरा रंग ठेवण्यामागील दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे सुरक्षितता. पांढरा रंग वापल्याने विमान सहजपणे दिसते. दिवस असो वा रात्र, पांढरा रंग प्रकाश परावर्तित करतो. ज्यामुळे, पायलट आणि इतर विमानांना एकमेकांचं लोकेशन लगेच समजतं. जर अपघात झाला तर विमान लवकर शोधलं जाऊ शकतं.
तांत्रिक देखभाल: विमानावर कधीतरी तडा, भेग किंवा इधन गळती सारख्या समस्या निर्माण होतात. अशा वेळी विमानाला पांढऱ्या रंगाने रंगवल्याने हे दोष पटकन ओळखता येतो. त्यामुळे, विमानाची देखभाल करणे अधिक सोपे, सुरक्षित होते आणि मुख्य म्हणजे अपघाताचे धोके टाळता येतात.
स्वस्त आणि टिकाऊ: इतर गडद रंगांच्या तुलनेत पांढरा रंग स्वस्त, हलकं आणि टिकाऊ असतं. विमानावर रंगांच्या थरामुळे वजन वाढतं. मुख्य म्हणजे कमी वजन म्हणजे कमी इंधनाखर्च आणि जास्त कार्यक्षमता असते. त्यामुळे, हा निर्णय विमान कंपन्यांसाठी फायदेशीर ठरतो.