पुरुषांमध्ये छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रा

Heart Attack Symptoms: महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे पुरुषांपेक्षा वेगळी का असतात? या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष

Heart Attack Symptoms: हृदयविकाराचा झटका हा एकेकाळी केवळ वृद्ध पुरुषांमध्ये आढळून येत होता. मात्र आजच्या काळात हा आजार प्रत्येक वयोगटातील तसेच स्त्री आणि पुरुषांमध्ये आढळतो. विशेषतः महिलांमध्ये हृदयविकाराचे प्रमाण झपाट्याने वाढत असून ही बाब चिंताजनक आहे. चुकीची जीवनशैली, असंतुलित आहार, ताणतणाव, धूम्रपान आणि शारीरिक निष्क्रियता ही याची मुख्य कारणे मानली जातात. पुरुषांमध्ये छातीत तीव्र वेदना, श्वास घेण्यास त्रास आणि डाव्या हातात वेदना अशी लक्षणे दिसून येतात, तर महिलांमध्ये ही लक्षणे अनेकदा सूक्ष्म किंवा वेगळी असतात. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष होते आणि उपचार उशिरा सुरू होतात.

महिलांमध्ये दिसून येणारी हृदयविकाराची लक्षणे - 

असामान्य थकवा – हलके काम करूनही थकवा जाणवणे किंवा सतत अशक्तपणा वाटणे.

श्वास घेण्यास त्रास व चक्कर – थोड्याशा श्रमाने श्वास लागणे, चक्कर येणे.

छातीत अस्वस्थता – छातील दाब, किंवा जडपणा जाणवणे. 

पचनाच्या समस्या – मळमळ, उलट्या, अपचन, वरच्या पोटात दुखणे.

झोपेचा त्रास – झोप न लागणे किंवा पूर्ण झोप झाल्यावरही थकवा वाटणे.

महिलांमधील लक्षणे का ओळखली जात नाहीत?

महिलांमध्ये हार्मोनल बदल, मायक्रोव्हॅस्क्युलर डिसफंक्शन (CMD) किंवा स्पोंटेन्शियस कोरोनरी आर्टरी डिसेक्शन (SCAD) यामुळे लक्षणे वेगळी असतात. त्यामुळे नियमित तपासण्यांमध्येही समस्या ओळखली न जाण्याची शक्यता असते.

महिलांमध्ये हृदयविकाराचा धोका वाढवणारे घटक

कौटुंबिक इतिहास

गर्भधारणेशी संबंधित आजार (प्रीक्लेम्पसिया, गर्भावस्थेतील मधुमेह) लठ्ठपणा व उच्च रक्तदाब सूक्ष्म रक्तवाहिन्यांशी संबंधित आजार अशक्तपणा व स्त्रीरोगविषयक समस्या

हेही वाचा - Hair Fall Reasons: तुमचे केस गळत आहेत का? 'या' 5 गंभीर आजारांचे असू शकतात संकेत

हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपाय

संतुलित आहार – फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, कमी चरबीयुक्त प्रथिने घ्या.

नियमित व्यायाम – आठवड्यातून किमान 150 मिनिटे व्यायाम करा.

तणाव नियंत्रण – योग, ध्यान, श्वसनाचे व्यायाम करा.

धूम्रपान व मद्यपान टाळा – धूम्रपान व मद्यपान हे हृदयासाठी सर्वात धोकादायक घटक आहेत. 

नियमित तपासणी – रक्तदाब, कोलेस्टेरॉल, साखर वेळोवेळी तपासा.

कौटुंबिक इतिहासाची काळजी – जर घरात हृदयविकाराचा इतिहास असेल तर विशेष दक्षता घ्या.

हेही वाचा Health Tips: आवळा खाताय मग सावधान...., 'या' लोकांनी चुकूनही खाऊ नये

महिलांमध्ये हृदयविकाराची लक्षणे अनेकदा लपलेली आणि वेगळी असतात. त्यामुळे त्याकडे वेळेवर लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. निरोगी जीवनशैली, योग्य आहार, नियमित तपासणी आणि तज्ज्ञांचा सल्ला यामुळे महिला हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात. 

(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)