बादास दानवे यांच्या सन्मानार्थ सभागृहात कार्यक्रम

शिवसेना फुटीनंतर फडणवीस-ठाकरे-शिंदे-अजित पवार पहिल्यांदाच एकत्र

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नवनवीन घडामोडी घडत असतात. अशातच, बुधवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या सन्मानार्थ सभागृहात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यानिमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार एकाच मंचावर पाहायला मिळाले. यादरम्यान, उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकाच सभागृहात आमने-सामने बसले होते. मात्र, उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला. 

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

'अंबादास तुम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आला नाही, पण भरलेल्या ताटाशी प्रतारणा देखील केली नाही. ताट वाढून दिली त्या पक्षाशी प्रतारणा केली नाही. नाहीतर त्या ताटात आहे ते माझंच आहे आणि आणखी मिळावं म्हणून आणखी दुसरं रेस्टॉरंटमध्ये जायचं असा अपराध तुम्ही केला नाही. त्याबद्दल जनता तुम्हाला धन्यवाद देते', असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हेही वाचा: TODAY'S HOROSCOPE: यश हवे आहे? मग 'या' राशींनी आजच जुने विचार सोडून द्या

एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया

'बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे, चांगल्या लोकांना चांगलं म्हणा. बाळासाहेबांच्या पठडीत तुम्ही तयार झाला आहात, मीही तयार झालो आहे. अंबादास दानवे विरोधी पक्षनेते होते. विरोधी पक्षनेता पद हे महत्त्वाचं असतं. मी सुद्धा काही काळ विरोधी पक्षनेता होतो. त्या काळात देखील संपूर्ण महाराष्ट्रात विरोधी पक्षनेता म्हणून सरकारला जाब विचारण्याचे काम केले. यादरम्यान, मी शेतकऱ्यांच्या समस्या सरकारच्या कानावर घालण्याचं कामही केलं. ज्या ठिकाणी अतिवृष्टी, अवकाळी पाऊस आला, शेतकऱ्यांवर संकट आलं तेव्हा आपण विरोधी पक्षनेता म्हणून मदतीसाठी धावून जातो. अंबादास दानवे यांनी ते काम केलं. विरोधी पक्षनेता हा महाराष्ट्राच्या जनतेचा एक प्रतिनिधी सभागृहात असतो. म्हणून अंबादास दानवे यांनी एक कार्यकर्ते म्हणून काम केले. कार्यकर्ते म्हणून काम करताना त्यांनी लोकांच्या दुःख, वेदना आणि प्रश्नांना वक्तृत्वपूर्णपणे मांडले. जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले. तसेच, आजचा दिवस चांगल्या असल्याने मी राजकीय बोलणं टाळतो', असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

एकीकडे शिवसेना पक्षात फूट पडल्याने एकनाथ शिंदे यांनी जास्तीत जास्त आमदारांना आपल्या बाजूला वळवले. इतकच नाही, तर शिवसेना या पक्षाचं नाव आणि चिन्ह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळालं. या कारणाने उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद तर गेलंच, शिवाय राज्यातील जाजकारणात बॅकफूटला गेले. मात्र, या घटनेनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच वेळी, एकाच सभागृहात कधी एकत्र दिसतील? हा प्रश्न अनेकांना पडला होता. अखेर तीन वर्षांनी तो योग जुळून आला.

बुधवारी, सभागृहात अनेक घडामोडी घडल्या. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा निरोप समारंभ पार पडला. या निरोप समारंभासाठी उद्धव ठाकरे बुधवारी विधान परिषदेच्या सभागृहात हजर होते. यादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील सभागृहात उपस्थित होते. एकाच वेळी इतके दिग्गज आणि मोठे नेते सभागृहात उपस्थित राहण्याची ही पहिलीच वेळ होती. यावेळी, उद्धव ठाकरेंनी नाव न घेता एकनाथ शिंदेंवर घणाघात टीका केली. शिंदेंच्या वक्तव्याला प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी देखील एकनाथ शिंदेंवर लक्ष्य साधले.