पंतप्रधान मोदींनी फडणवीसांना दिल्या कोणत्या सूचना?
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंत्र दिल्याचं समोर आलंय. दिल्लीतील शपथविधीवेळी मोदी-फडणवीस भेटीचा तपशील समोर आलाय. 'स्वच्छ प्रशासन चालवताना कुणाचीही पर्वा करु नका' 'प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा' असा कानमंत्र मोदींनी फडणवीसांना दिला असल्याचं समोर आलंय.
दिल्लीत भाजपचे सरकार स्थापन झाले तेव्हा भाजपचे आणि त्यांच्या मित्रपक्षांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि प्रमुख नेते उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भेट झाली. या भेटीदरम्यानचा तपशील समोर आला असून पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रशासन हाताळण्याच्या संदर्भात विशेष सुचना केल्याची माहिती समोर आलीय.
दरम्यान 'स्वच्छ प्रशासन चालवताना कुणाचीही पर्वा करु नका' 'प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता, शिस्त आणण्यासाठी सर्व प्रयत्न करा' असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला असल्याचं समोर आलंय. त्याचबरोबर दिल्लीतील शपथविधीवेळी मोदी-फडणवीस भेटीचा तपशील समोर आला असून स्वच्छ प्रशासन असलेच पाहिजे.असे करताना कुणाचीही पर्वा करू नका. असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिल्याची माहिती समोर आलीय.