Nagpur Wall Collapsed : नागपूर हादरलं! 130 वर्ष जुनी भिंत कोसळली; 3 कार दबल्या
नागपूर: सोमवारी सायंकाळी नागपूर शहरातील मारवाडी चाळीत मोठी दुर्घटना टळली. 130 वर्षे जुनी भिंत अचानक कोसळली. जेव्हा भिंत कोसळली, तेव्हा खूप मोठा आवाज आला. त्यामुळे, नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. जेव्हा कार मालक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा त्यांची वाहने चक्काचूर झाल्याचे निर्दशनात आढळले. दरम्यान, भिंत पडत असतानाच तेथून एक दुचाकी जात होती. जेव्हा दुचाकीस्वार पुढे निघून गेला, तेव्हा 130 वर्षे जुनी भिंत अचानक कोसळली. सुदैवाने त्याला कोणतीही इजा झाली नाही. दुचाकीस्वार थोडक्यात बचावला.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, ही भिंत बऱ्याच काळापासून धोकादायक स्थितीत होती. पावसामुळे ती आणखी कमकुवत झाली, शेवटी ही भिंत कोसळली. महानगरपालिकेने सादर केलेल्या अहवालानुसार, नागपुरात एकूण 241 जुन्या इमारती आहेत. त्यापैकी 51 इमारती अत्यंत धोकादायक स्थितीत आहेत. त्यामुळे, नागरिकांनी अशा इमारतींपासून लांब राहण्याचे आवाहन महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.