ताम्हिणी घाटात ST बसच्या धडकेत कारचा चक्काचूर, 2 ठार, 3 जखमी!
माणगाव: रायगड जिल्ह्यातील ताम्हिणी घाटात मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. खेड-चिंचवडकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या एसटी बसची माणगावच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट कारसोबत समोरासमोर धडक झाली.अपघात इतका भीषण होता की कारचा चक्काचूर झाला. या अपघातात कारचालक व एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर स्थानिक आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले.
अपघाताची कारणे आणि सध्या परिस्थिती प्राथमिक माहितीनुसार, कारचालकाचा वाहनावरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला असावा. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्य हाती घेतले. क्रेनच्या साह्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला करण्यात आली असून, आता मार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.
हेही वाचा : लोकलमधील जाहिरातींच्या गोंगाटामुळे प्रवाशांचा संताप
ताम्हिणी घाटातील वळणदार आणि धोकादायक रस्त्यांवर वाहन चालवताना विशेष काळजी घेण्याची गरज आहे. वेगावर नियंत्रण आणि नियमांचे पालन केल्यास अशा दुर्दैवी अपघातांना आळा घालता येऊ शकतो.