मृत विद्यार्थिनीचे नाव हर्षिता पाल असून ती निर्मला

कमी रक्तदाबामुळे 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू; कांदिवलीतील घटना

Girl dies due to low blood pressure In Kandivali प्रतिकात्मक प्रतिमा

मुंबई: कांदिवलीत कमी रक्तदाबामुळे एका 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. मृत विद्यार्थिनीचे नाव हर्षिता पाल असून ती निर्मला महाविद्यालयात बी.एससी. आयटीच्या दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी होती. माध्यमांमधील वृत्तानुसार, हर्षिता तिच्या महाविद्यालयाच्या गेटजवळ अचानक कोसळली. तिचा रक्तदाब तीव्र स्वरूपात कमी झाल्याने तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. हर्षिता कांदिवलीतील हनुमान नगर येथील रहिवासी होती.

दरम्यान, समता नगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी जयंत शिंदे यांनी सांगितले की, तिला आधीपासूनच कमी रक्तदाबाचा त्रास होता. मृत्यूच्या काही दिवसांपूर्वीपासून ती अस्वस्थ होती. तिच्या मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी शवविच्छेदन करण्यात येणार आहे.

हेही वाचा - लोकल अपघातात 26 हजार प्रवाशांचा मृत्यू; अन् रेल्वेकडून आर्थिक मदत फक्त 1400 कुटुंबीयांना

हायपोटेन्शन म्हणजे काय?

कमी रक्तदाबालाचं हायपोटेन्शन म्हणतात. ही एक गंभीर आरोग्य स्थिती आहे. प्रौढ व्यक्तीसाठी सामान्य रक्तदाबाचा मापदंड 120/80 मिमीएचजी असतो. याच्या खाली रक्तदाब गेल्यास मेंदू व इतर अवयवांमध्ये रक्त आणि ऑक्सिजन कमी पोहोचतो. त्यामुळे मेंदूच्या पेशींचा मृत्यू, हृदयाची धडधड वाढणे आणि गंभीर प्रकरणांमध्ये अवयव निकामी होण्याचा धोका असतो.

हेही वाचा - सांगलीत 185 बोगस पॅथॉलॉजी लॅबचा पर्दाफाश; राजकीय हस्तक्षेपामुळे कारवाईला ब्रेक

हायपोटेन्शनमुळे झाला होता शेफाली जरीवालाचा मृत्यू -  

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री शेफाली जरीवाला यांचा देखील हायपोटेन्शनमुळे मृत्यू झाला होता. 42 वर्षीय जरीवाला यांचे 27 जून 2025 रोजी संशयास्पद परिस्थितीत निधन झाले. रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे अभिनेत्री बेशुद्ध झाली होती. अंधेरी येथील रुग्णालयात दाखल केल्यानंतर शेफालीला मृत घोषित करण्यात आले.