उष्माघातामुळे 48 वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू
छत्रपती संभाजीनगर: पैठणमधील दावरवाडी येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. सकाळी शेतात काम करून घरी परतल्यानंतर 48 वर्षीय शेतकऱ्याचा उष्माघाताने मृत्यू झाला. शनिवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास दावरवाडी येथे ही घटना घडली. संजय जनार्दन सरोदे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
शनिवारी सकाळी संजय जनार्दन सरोदे लवकर उठले आणि कामानिमित्ताने शेतात गेले होते. दुपारी बारा ते एक वाजता संजय सरोदे गावात आले होते. मात्र, उन्हाच्या तीव्र उष्णतेमुळे गावात पोहोचताच संजय सरोदे जमिनीवर कोसळले. त्यांना चक्कर आल्याचे समजताच, क्षणाचाही विलंब न करता गावकऱ्यांनी त्यांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. संदीपान काळे यांनी तपासणी केल्यानंतर त्यांना मृत घोषित केले.
हेही वाचा: पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने कर्ज का दिले? एमआयएमचे नेते ओवैसींचा सवाल
पैठण तालुक्यातील दावरवाडी येथील संजय सरोदे यांची दोन एकर शेती आहे आणि ते शेती करत होते. संजय सरोदे यांना तीन मुली आणि एक मुलगा आहे. सरोदे यांच्या दोन मुलींचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले होते.