70 वर्षीय नराधमाला 20 वर्षांचा कारावास; गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
कोल्हापूर : कोल्हापूरात 70 वर्षीय नराधमाने गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला होता. 2019 मध्ये कोल्हापुरात अत्याचार झाला होता. या प्रकरणात 70 वर्षीय नराधमाला 20 वर्षांचा कारावास झाला आहे.
कोल्हापूरात नाती समान असलेल्या गतिमंद अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दादू लक्ष्मण यादवला २० वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली. खटल्यात सरकारतर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रतिभा जयकर जाधव यांनी काम पाहिले होते. 2019 मध्ये घडलेल्या या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली होती.
हेही वाचा: टेबलावर नोटांचे बंडल; खोक्याचा व्हिडिओ व्हायरल पीडित अल्पवयीन मुलगी चुलत बहिणीसोबत खेळताना आरोपी दादू यादव याने जबरदस्तीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना पीडितेने बहिण आणि आईला सांगितली. यानंतर यादव याने उडवाउडवीची उत्तरे देऊन अरेरावी केली होती. या प्रकरणी वडगांव पोलिस ठाण्यात त्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला होता.
कोल्हापूरात खेळत असताना गतिमंद मुलीवर खेळत असताना अत्याचार झाल्याची घटना घडली होती. ही घटना 2019 मध्ये घडली. 70 वर्ष असणाऱ्या व्यक्तीने हा लैंगिक अत्याचार केला होता. या नराधमाचे नाव दादू लक्ष्मण यादव असे आहे. अत्याचार केल्यानंतर आरोपी यादव याला पीडितेच्या आईने विचारले असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच अरेरावीची भाषा वापरली. त्यानंतर त्याच्यावर पोलिसांनी कारवाई केली. हे प्रकरण 4 वर्षांपेक्षा अधिक काळ न्यायालयात चालू होते. आता या प्रकरणाचा निकाल लागला आहे. अत्याचार करणाऱ्या 70 वर्षीय नराधमाला 20 वर्षांच्या कारावासाची शिक्षा झाली आहे.