शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणात आता मोठी अपडेट

बुलढाण्यातील केस गळती प्रकरणात मोठी अपडेट,गावकऱ्यांना डोळ्यांचा त्रासही सुरू

बुलढाणा : जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणात एक मोठी अपडेट समोर आला आहे. सध्या केस गळती थांबली असली तरी अनेक नागरिक डोळ्यांच्या समस्यांनी त्रस्त झाले आहेत. केस गळती झालेल्या गावकऱ्यांना दृष्टी दोष आल्याचा दावा केला जात आहे.

आरोग्य यंत्रणेने केस गळतीचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला असला तरी अद्याप यामध्ये कोणताही ठोस निष्कर्ष आलेला नाही. मात्र, या समस्येने बाधित झालेल्या लोकांची दृष्टी कमी होण्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेने आता नवा प्रश्न उभा केला आहे की, आरोग्य यंत्रणेने दिलेल्या उपचारांनंतर हा त्रास उभा राहिला का?

हेही वाचा 👉🏻👉🏻 बुलढाण्यात महिलेच्या गर्भातील बाळाच्या पोटातही बाळ

गावकऱ्यांचा असा विचार आहे की, आरोग्य यंत्रणेने केस गळतीच्या कारणाची शोध घेऊन त्यावर योग्य उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. याचसोबत, डोळ्यांचा त्रास वाढल्याने, दृष्टी कमी होण्याच्या धोक्याबद्दलही गांभीर्याने विचार केला पाहिजे.

हेही वाचा 👉🏻👉🏻 बुलढाणा ब्रेकिंग न्यूज : या जिल्ह्यातील नागरिकांची ८ दिवसापासून अंघोळच नाही...

त्याचबरोबर जिल्ह्यातील गावकऱ्यांकडून मागणी केली जात आहे की, आरोग्य यंत्रणा त्वरित लक्ष देऊन यावर योग्य उपचार आणि सल्ला देत या समस्येचा निराकरण करा.

जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा.