कोकणात ठाकरे गटाला मोठा झटका मिळालाय. ठाकरे गटाचे

कोकणात ठाकरे गटाला मोठा झटका; कोणत्या नेत्याने दिला राजीनामा

सिंधुदुर्ग: कोकणात ठाकरे गटाला मोठा झटका मिळालाय. ठाकरे गटाचे कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी पदाचा राजीनामा दिलाय. माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याचं बोललं जातंय.  जय महाराष्ट्र न्यूजच्या थेट संपर्कात राहण्यासाठी  व्हॉट्सअप चॅनेल वर क्लिक करा. दरम्यान कोकणात ठाकरे गटाला मोठा झटका मिळाला असून जनतेला अपेक्षित असलेला पक्षप्रवेश येत्या आठ दिवसांत होणार असा गौप्यस्फोट मंत्री उदय सामंत यांनी केला होता. त्यानंतर आता कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी पदाचा राजीनामा दिला असल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरूय. 

दरम्यान मराठी माणसांचा मुद्दा सोडून हिंदुत्व स्वीकारलं ही शिवसेनेची सर्वात मोठी चूक असल्याचे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनी व्यक्त केले. मराठीचा मुद्दा सोडून शिवसेनेनं हिंदुत्व स्वीकारलं आणि RSS ला मदत केल्याचे दलवाई म्हणाले. शिवसेनेच्या त्या चुकीमुळं मुंबईची गुजरातीकरण होत आहे. शिवसेनेनं मराठीचा मुद्दा पुन्हा हातात घ्यावा असं  हुसेन दलवाई म्हणाले आहेत. 

माजी आमदार वैभव नाईक यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून कणकवली विधानसभा संपर्कप्रमुख अतुल रावराणे यांनी पदाचा राजीनामा दिला असून अतुल रावराणे नेमकं आता कोणत्या पक्षात जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणारे. राजकीय वर्तुळात सद्या हीच चर्चा रंगली असून सर्वसामान्यांचे सुद्धा याकडेच लक्ष लक्ष आहे की, अतुल रावराणे कोणत्या पक्षात प्रवेश करणार.