ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांग

Gunratna Sadavarte Vs Manoj Jarange : 'भाईजान, मामूजान, जरांगेजान'; सदावर्तेंचा 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

मुंबई: ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगेंवर भाष्य केले. सदावर्ते म्हणाले की, 'शासनाच्या जीआरचं काय आयुष्य आहे, काय भविष्य आहे हे अल्पावधीतच समजेल. तो म्हणतो की, 17 सप्टेंबरपर्यंत जर प्रमाणपत्र नाही दिले, तर म्हणे.. तर म्हणे... तर म्हणे. मला वाटतं की आमचे दाढीवाले मिया भाई बोलो भाईजान, बोलो मामूजान, बोलो जरांगेजान. ते म्हणतात ना, वाण नाही तर गुणाला, मला तर असं वाटतं आहे इथे जे मामूजान भेटायला आले होते ना आझाद मैदानात, व्यवस्था करू लागले सगळी हिंदू राष्ट्र भारत हमारा माननारे असायला पाहिजे. नसेल तर त्यांची सोय करता येते आम्हाला कायद्याप्रमाणे. आम्ही सगळे व्हिडिओ पाहत आहोत'.

हेही वाचा: Lalbaugcha Raja : लालबागचा राजाच्या विसर्जनानंतर 'या' समितीने पाठवले मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; जाणून घ्या

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यासाठी 29 ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणाला बसले होते. यादरम्यान, मराठा समाज लाखोंच्या संख्येने मुंबईतील आझाद मैदानात उपस्थित होते. तेव्हा, मनोज जरांगे म्हणाले होते की, 'जोपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची अंमलबजावणी होत नाही, तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही'. 

त्यानंतर, राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगेंचे सहापैकी चार मागण्या मान्य केले. यासह, जरांगेंनी फडणवीसांचे आभार मानले. यासह, जरांगे म्हणाले की, 'कुणी बॅनर लावा किंवा कॅम्पेन करा, काय करायचं आहे ते करा. जीआरची अंमलबजावणी तातडीने करून हैदराबाद गॅझेट या नोंदणीच्या आधारे मराठवाड्यातला हा सगळा मराठा हा कुणबी आहे, हे प्रमाणपत्र वाटायला सुरूवात करा. आम्ही पुन्हा एकदा तुमचं कौतुक आणि आभार मानू'.