राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेत

Jalna Jodimaro Andolan : पृथ्वीराज चव्हाणांच्या निषेधार्थ युवासेनेचे जोडेमारो आंदोलन

जालना: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक वादग्रस्त विधान केले. चव्हाण म्हणाले की, 'भगवा दहशतवाद ऐवजी हिंदू दहशतवाद म्हणाले पाहिजे'. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यादरम्यान, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीने जालन्यात जोडेमारो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन, जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आले. 

हेही वाचा: 'मोदींचं नाव घेतलं तर...'; मालेगाव स्फोटप्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह यांचा खळबळजनक दावा

या दरम्यान, पृथ्वीराज चव्हाण यांच्या फोटोला जोडेमारत त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. यावेळी, पृथ्वीराज चव्हाण यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली. या जोरदार घोषणाबाजीने परिसर हादरला होता. 'जेव्हा पृथ्वीराज चव्हाण जालन्यात येतील, तेव्हा आम्ही त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांचा विरोध करू', अशी प्रतिक्रिया शिवसेना युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.