Agriculture news Update : कापूस खरेदी तर सुरू, पण आयात शुल्कामुळे शेतकऱ्यांना फटका
भारतीय कापूस मंडळाकडून महत्त्वाची माहीती समोर आली आहे. देशभरात सध्या 550 कापूस खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. तसेच महाराष्ट्रात 150 पेक्षा अधिक केंद्रांवर कापूस खरेदी होणार आहे. राज्यात 15 ऑक्टोबरपासून अधिकृतरीत्या खरेदीला सुरुवात होईल, अशी माहिती सीसीआयचे अध्यक्ष ललित कुमार गुप्ता यांनी दिली.
शेतकरी मात्र चिंतेत कापसावरील 11 टक्के आयात शुल्क 31 डिसेंबरपर्यंत काढून टाकले आहे.त्यामुळे कापसाची आयात वाढेल आणि याचा थेट परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारभाव दबावाखाली येतील. परिणामी हमीभाव जाहीर असला तरी खुल्या बाजारातील दर कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंतेचे वातावरण आहे.
गेल्या हंगामात सीसीआयने 25 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली होती, तर यंदा त्यापेक्षा अधिक खरेदी होण्याचा अंदाज आहे. शुल्कमुक्त आयात धोरणामुळे बाजारभाव कमी राहतील अशी शक्यता असल्याने शेतकऱ्यांचा कल सरकारी खरेदीकडे राहणार आहे.