'कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या';अजित दादांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
रायगड: पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांच्या राजकीय वक्तव्यासाठी विशेष ओळखले जातात. अशातच, अलिबाग येथे रविवारी राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला. या दरम्यान, अजित दादांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला. ते म्हणाले की, 'कुणी अंगावर आलं तर त्याला शिंगावर घ्या'. त्यांच्या या वक्तव्याने सर्वत्र हास्याची लाट उसळली.
काय म्हणाले अजित पवार?
'कुणी आरे केलं तर त्याला कारे करा. माझी सुरूवात आरेला कारे आहे. त्यामुळे, मी बोलत आहे, तर तुम्ही सुद्धा म्हणायलाच पाहिजे ना? फक्त त्यामध्ये कारण नसताना कुणाला अंगावर घ्यायचं नाही. पण कुणी अंगावर आलं तर मगं त्याला शिंगावर घ्यायला सुद्धा मागं पुढं करायचं नाही. कारण आम्ही कोणाच्या मागे लागत नाही, दुसऱ्यांनीही आमच्या नाही लागायचं नाही. जर नादी लागलं तर मग काय करायचं? मग मी आता सांगितलं तर मी त्याच पद्धतीने करावं लागेल. अर्थांत हे सगळं करत असताना कायदा, नियम, संविधान याचं उल्लंघन होऊ द्यायचं नाही टीव्ही वाल्यांनो', असं वक्तव्य अजित दादांनी केलं.