प्रेमसंबंधातून झालेल्या त्रासामुळे उडी मारली; वर्ग

वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून डी वाय पाटील कॉलेजमधील तरुणीची आत्महत्या

पुणे : आकुर्डी येथील डी वाय पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिक्षण घेत असलेल्या सहिती कलुगोटाला रेड्डी या तरुणीने वाकडमधील एका इमारतीच्या १५ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. सुरुवातीला तिच्या मृत्यूची नोंद अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली होती. मात्र, पोलिस तपासात तिचा वर्गमित्र प्रणव राजेंद्र डोंगरे हाच तिला मानसिक व शारीरिक त्रास देत असल्याचे उघडकीस आले आहे.

सहिती आणि प्रणव यांचे प्रेमसंबंध होते. प्रणवने सहितीच्या प्रेमाचा गैरफायदा घेतला आणि तिला वारंवार शारीरिक व मानसिक त्रास देत होता. या सततच्या छळामुळे सहिती तणावाखाली होती आणि शेवटी तिने आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. तिच्या आत्महत्येनंतर कलुगोटाला रेड्डी यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

पोलिसांनी प्रणव डोंगरे याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक केली आहे. सदर प्रकरणाचा वाकड पोलीस तपास करत असून, या दुर्दैवी घटनेमुळे कॉलेज व परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

👉👉 हे देखील वाचा : छत्रपती संभाजीनगरात सरकारी कर्मचाऱ्याला ऑनलाईन मैत्री 17 लाखांत भोवली