मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती: गृहमंत्र

शिंदे-पवार-फडणवीस यांची अमित शाहांसोबत चर्चा; बैठकीत नागरी समस्यांवर भर

अमित शहांचा दौरा: महाराष्ट्र-गुजरात-गोव्याच्या गृहमंत्र्यांची महत्त्वपूर्ण बैठक

पुणे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय परिषदेची 27 वी बैठक थोड्याच वेळात सुरू होणार आहे. या बैठकीत महाराष्ट्र, गोवा, गुजरात या राज्यांसह दादरा नगर हवेली, दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या परिषदेच्या माध्यमातून राज्यांमध्ये सहकार्य वाढवण्यासह नागरी समस्यांवर सखोल चर्चा केली जाणार आहे.

या परिषदेचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय गृहमंत्री असतात, तर संबंधित राज्यांचे मुख्यमंत्री उपाध्यक्ष म्हणून आळीपाळीने कार्य करतात. बैठकीसाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. गेल्या वर्षी पटणा येथे 26 वी पूर्व विभागीय बैठक पार पडली होती, त्यावेळीही अमित शाह यांनी परिषदेचे नेतृत्व केले होते.

बैठकीपूर्वीच महाराष्ट्रातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहाटेच अमित शाहांची भेट घेतली होती, तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हॉटेल वेस्टीन येथे अमित शाहांची भेट घेतली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा हे देखील पुण्यात एका हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत.

👉👉 हे देखील वाचा : महाराष्ट्र सरकारवर तब्बल आठ लाख कोटींचे कर्ज ठाकरे गटाचा गंभीर आरोप

या बैठकीत गृहविषयक प्राधान्यक्रम, राज्यांमधील समन्वय, नागरी समस्या आणि सुरक्षा विषयांवर चर्चा होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील विविध मुद्द्यांवरही या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा होण्याची शक्यता आहे.

बैठकीसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीला आणि त्याआधीच्या राजकीय भेटींमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उलथापालथ होण्याची शक्यता आहे. अमित शहांच्या या दौऱ्यामुळे भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांच्या आगामी राजकीय रणनीतीबाबत महत्त्वपूर्ण संकेत मिळू शकतात.

 

कसा असेल अमित शाहांचा पुणे दौरा?

कोरेगाव पार्कच्या वेस्टीनमध्ये पश्चिम गृहविभागाची बैठक गुजरात, गोवा, महाराष्ट्र , दादरा-नगरहवेली, दिव दमनचे प्रतिनिधीही उपस्थित दुपारी जनता सहकारी बँकेचा अमृत महोत्सवी समारंभ हडपसरच्या विठठ्लराव तुपे नाट्यगृहात कार्यक्रम  संध्याकाळी 5 वाजता बालेवाडीतील क्रीडा संकुलात कार्यक्रम प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरीपत्र वितरण